साहेब घाबरु नका, मुंबईत शिवसेनाच येणार ! चंद्रभागा आजींचा उद्धव ठाकरेंना आशिर्वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसेचं पठन करण्याचं आव्हान दिल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी करत प्रतिउत्तर दिलं. या गर्दीत 80 वर्षांच्या आजी आणि कट्टर शिवसैनिक चंद्रभागाबाई शिंदे यांची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या चंद्रभागाबाईंची उद्धव ठाकरेंनी भेटही घेतली.

ADVERTISEMENT

दरम्यान पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर असताना, उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट टाळत संध्याकाळी परळ भागात चंद्रभागाबाईंची भेट घेतली. या भेटीदरम्यान चंद्रभागाबाईंनी उद्धव ठाकरेंना, मुंबईत शिवसेनाच येणार असा आशिर्वाद देत तुम्ही घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असा आशिर्वाद दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे चंद्रभागाबाई शिंदेंच्या घरी संध्याकाळी पोहचले. यावेळी उद्धव ठाकरेंनी चंद्रभागाबाईंशी गप्पा मारत त्यांचा आशिर्वाद घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीची चांगलीच चर्चा रंगली. चंद्रभागाबाईंनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आधार देत, “साहेब तुम्ही घाबरु नका आम्ही तुमच्यासोबतच आहोत. मुंबईत शिवसेनेचा येणार. यंदाही आपलाच भगवा लागणार”, असं सांगितलं.

हे वाचलं का?

चंद्रभागाबाईंची भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेबांनी हे असे निष्ठावान आणि कट्टर शिवसैनीक तयार केले हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आशिर्वाद आहे. त्यांचं वय जरीही झालं असलं तरीही त्यांच्यातला उत्साह आजही कायम आहे. माझ्यासाठी आजही त्या युवा सेनेच्या कार्यकर्त्या आहेत. मी लहान असल्यापासून ही मंडळी आमच्यामागे ठाम उभी राहिली आहेत. बाळासाहेबांनी झुकणारे शिवसैनिक तयार केले नाहीत. आंदोलनाच्या स्थळावरही कडक उन्हामध्ये आजी हजर होत्या, त्यामुळे त्यांच्याशी येऊन संवाद साधणं हे माझं कर्तव्य होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे घरी आल्यानंतर कसं वाटतंय असं विचारलं असता चंद्रभागाबाईंनीही साहेब आणि वहिनींचे पाय माझ्या घराला लागले त्यामुळे मी आज भरुन पावले असं सांगितलं. त्यामुळे मोदींसोबतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं टाळून 80 वर्षांच्या चंद्रभागाबाईंची उद्धव ठाकरेंनी घेतलेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT