ChatGPT वर गंभीर आरोप करणाऱ्या भारतीय इंजिनीअरचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह, कारण काय?

मुंबई तक

Suchir Balaji Case Open AI : सुचीर यांनी नुकतंच ओपनएआयच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली आणि 14 डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ChatGPT हा प्लॅटफॉर्म विकसित करणाऱ्या अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी OpenAI चे 26 वर्षीय माजी संशोधक सुचीर बालाजी त्यांचा मृतदेह सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असलेल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. सुचीर यांनी नुकतंच ओपनएआयच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली आणि 14 डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. 

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बालाजी यांनी बऱ्याच दिवसांपासून आपलं घर सोडलं नव्हतं आणि आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांच्या फोन कॉललाही ते उत्तर देत नव्हते. सुचीरचे मित्र आणि सहकारी त्याच्या फ्लॅटवर पोहोचले असता त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचं कळलं. तेव्हा त्यांनी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुचीर बालाजी यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात कुठलाही गैरप्रकार झाल्याचे पुरावे मिळालेले नसून, ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा संशय आहे.

हे ही वाचा >> CM Revanth Reddy on Allu Arjun : "अल्लू अर्जून गाडीवर उभं राहून...", अल्लू अर्जूनच्या अटकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकलला या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार पोलीस अधिकारी वैद्यकीय पथकासह फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांना सुचीर बालाजी मृत आढळला. प्राथमिक तपासात घातपाताचा कोणताही पुरावा आढळून आला नसून हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाच्या संचालकांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, 'प्राथमिक चौकशीनुसार ही आत्महत्या असावी.' 

हे ही वाचा >> Allu Arjun Arrest: संध्या थिएटरच्या घटनेला अल्लू अर्जुनच जबाबदार? 'त्या' लेटरने उडवली खळबळ!

दरम्यान, सुचीर बालाजी यांनी यावर्षीच ऑगस्टमध्ये OpenAI मधून राजीनामा दिला होता आणि कंपनीवर कॉपीराइट उल्लंघनाचे गंभीर आरोप केले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक बड्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून, इंटरनेटवर याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp