हिंगणघाट जळीतकांड : अंकिताला पेटवून देणारा विकेश दोषी; स्मृती दिनीच सुनावली जाणार शिक्षा
महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळेला जलदगतीने न्यायालयाने आज दोषी ठरवलं. अंकिताला जिवंत पेटवून देणाऱ्या विकेश नगराळेविरुद्ध 302 चा गुन्हा सिद्ध झाला असून, उद्या म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. १० फेब्रुवारी २०२० रोजीच अंकिताने अखेरचा श्वास घेतला होता. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून अंकिता पिसुड्डे हिला […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळेला जलदगतीने न्यायालयाने आज दोषी ठरवलं. अंकिताला जिवंत पेटवून देणाऱ्या विकेश नगराळेविरुद्ध 302 चा गुन्हा सिद्ध झाला असून, उद्या म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. १० फेब्रुवारी २०२० रोजीच अंकिताने अखेरचा श्वास घेतला होता.
ADVERTISEMENT
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून अंकिता पिसुड्डे हिला भरदिवसा पेटवून दिलं होतं. या घटनेला दोन वर्ष झाली आहेत. हे प्रकरणाची जलदगती न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने अंकिताच्या हत्येप्रकरणी विकेश नगराळेला आज दोषी ठरवलं आहे.
अरेरे! रडणाऱ्या चिमुकलीची बापाने नाक-तोंड दाबून केली हत्या; भाईंदरमधील हृदयद्रावक घटना
हे वाचलं का?
अरेरे! रडणाऱ्या चिमुकलीची बापाने नाक-तोंड दाबून केली हत्या; भाईंदरमधील हृदयद्रावक घटनाया प्रकरणात पोलिसांनी 426 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. तर खटला दाखल झाल्यानंतर जलदगती न्यायालयासमोर 64 सुनावण्या झाल्या. यात 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आलेले आहेत.
३ फेब्रुवारी २०२० रोजी काय घडलं?
ADVERTISEMENT
मयत अंकिता पिसुड्डे हिंगणघाट येथील स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र या विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. अंकिता आणि आरोपी विकेश नगराळे हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावात रहिवासी होते.
ADVERTISEMENT
Crime: देहविक्रीसाठी आईने 5 वर्षाच्या मुलीला विकलं, नराधमाकडून बलात्कारनंतर चिमुकलीची हत्या
3 फेब्रुवारी 2020 रोजी अंकिता महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडली. गावातून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने निघाली होती. महाविद्यालयात जात असतानाच रस्त्यात आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिताच्या जीवावर उठलेल्या विकेशने आधीच बाटलीमध्ये पेट्रोल भरून ठेवलं होतं. अंकिता दिसताच विकेशने दुचाकीतून काढलेलं पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले.
त्यात अंकिता ४० टक्के होरपळली. तिला तातडीने नागपूमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज आठवडाभरानंतर संपली. 10 फेब्रुवारी रोजी अंकिताने अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT