रश्मी ठाकरेंची ‘ती’ दोन पत्रं, सोमय्यांचा खळबळजनक दावा; पत्रात नेमकं काय?
मुंबई: भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज (21 फेब्रुवारी) पुन्हा एकदा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला आहे. त्यांनी या पत्रकार परिषदेत दोन पत्र वाचून दाखवली जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावच्या ग्रामपंचायतीला लिहिली आहेत. असा दावा सोमय्यांनी केला आहे. यावेळी बोलताना सोमय्यांनी आरोप केला […]
ADVERTISEMENT
मुंबई: भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज (21 फेब्रुवारी) पुन्हा एकदा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला आहे. त्यांनी या पत्रकार परिषदेत दोन पत्र वाचून दाखवली जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावच्या ग्रामपंचायतीला लिहिली आहेत. असा दावा सोमय्यांनी केला आहे. यावेळी बोलताना सोमय्यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरे हे खोटं बोलत आहेत.
ADVERTISEMENT
पाहा नेमकं काय म्हणाले सोमय्या
‘रश्मी ठाकरेंनी मे 2019 साली जमिनीसह बंगले खरेदी केल्याचं पत्र पाठवलं होतं. ते पत्र मी तुम्हाला दाखवलं आहे. त्याच रश्मी ठाकरे यांनी 2021 मध्ये दुसरं पत्र लिहलं की, मी जमीन घेतली त्यावर बंगले नव्हते. तर आता कोणते उद्धव ठाकरे खरे आहेत आणि कोणते खोटे आहेत? 2019 वाले खरे आहेत की, 2021 वाले? याबाबत भाजपला उद्धव ठाकरेंकडून स्पष्टता हवी आहे.’
हे वाचलं का?
पहिलं पत्र:
23 मे 2019 आणि जानेवारी 2019 रोजी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना पत्र लिहिलेलं. ‘आम्ही 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक यांच्या जागा खरेदी केल्या असून यातील असेसटमेंट क्रमांक 787 ते 779 आणि 801 ते 805 हे घर आमच्या नावे केल्यास मी आपले ऋणी राहीन.’
ADVERTISEMENT
‘असं रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी पत्रात नमूद केलं होतं. त्यावर सरपंचाची रिसीव्ह म्हणून सही देखील आहे. मी हे पत्रं ग्रामपंचायत, तहसील, तलाठी, कलेक्टर असे चार-चार ठिकाणी आरटीआयमधून मिळवलेलं आहे.’
ADVERTISEMENT
दुसरं पत्र:
2 फेब्रुवारी 2021 रोजीही रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना पत्रं लिहिलं होतं. ‘ही मिळकत आम्ही अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी विक्री खताद्वारे कायदेशीर प्रकिया करुन रितसर संपादन केली आहे. आम्ही मिळकत खरेदी केली तेव्हा कोणतेही बंगले अथवा घरे अस्तित्वात नव्हते.’ असं पत्रात म्हटलं आहे.
‘आता मला सांगा फोर्जरी कोण करत आहे, फसवणूक कोण करत आहे? जनतेची फसवणूक कोण करत आहे? बंगले नाही सांगत सोमय्याला जोड्याला मारणार असं तुम्ही म्हणता हे पत्रं काय आहे? मुख्यमंत्री यावर का बोलत नाही? शिवसेनेचे नेत्यांमध्ये त्यावर बोलण्याची हिंमत नाही.’ असं म्हणत सोमय्यांनी थेट ठाकरे कुटुंबावरच निशाणा साधला आहे.
‘आठ दिवसात संजय राऊतांनी माझ्यावर एवढे आरोप लावले. पण एक कागद देऊ शकले नाही. संजय राऊत आपण पालघरच्या प्रॉपर्टीबाबत बोलत आहात. आताच तिथल्या कलेक्टरने जमिनीचं व्हॅल्यूवेशन केलं. त्याची किंमत 15 कोटी पेक्षा जास्त नाही आणि आपण म्हणता त्याची किंमत 250 कोटीपेक्षा जास्त आहे. यापैकी एकही कागद तुम्ही का देऊ शकलेला नाहीत?’
उद्धवजी फक्त जनतेला सांगा, मुख्यमंत्री असूनही माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले-किरीट सोमय्या
‘खरं म्हणजे संजय राऊत हे कोव्हिड घोटाळ्यापासून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी नौटंकी करत आहेत. आम्ही ठाकरे सरकारच्या प्रत्येक घोटाळा लॉजिकल कन्क्ल्यूजनपर्यंत घेऊन जाऊ.’ असे अनेक आरोप सोमय्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेकडून त्यांच्या या आरोपाला नेमकं काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT