पत्नीचे परपूरूषासोबत अनैतिक संबंध, GPS ने फोडलं बिंग
एका पतीच्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) अनैतिक संबंध होते.या अनैतिक संबंधाची पतीला पुसटशी कल्पना देखील नव्हते. मात्र त्याने घेतलेल्या कारमुळे आणि त्यामध्ये असलेल्या जीपीएसमुळे पत्नीचे बिंग फुटले आहे. त्यामुळे पत्नीचे हे नाते कळताच पतीच्या पायाखालची जमीन सकरली.
ADVERTISEMENT
man discover wifes affair through car gps : देशभरात विवाहबाह्य संबंधाच्या (extra mariatal Affair) घटना खुप वाढल्या आहेत. या वाढत्या घटनामुळे गुन्ह्यांच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशाच एका पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची घटना समोर आली आहे.या घटनेत एका पतीच्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) अनैतिक संबंध होते.या अनैतिक संबंधाची पतीला पुसटशी कल्पना देखील नव्हते. त्याच्या बायकोसोबत सुरळीत आयु्ष्य सुरु होते.मात्र त्याने घेतलेल्या कारमुळे आणि त्यामध्ये असलेल्या जीपीएसमुळे पत्नीचे बिंग फुटले आहे. त्यामुळे पत्नीचे हे नाते कळताच पतीच्या पायाखालची जमीन सकरली आणि त्याला मोठा धक्का बसला. (man discover wifes affair through car gps bengluru incident)
ADVERTISEMENT
या घटनेतील दाम्पत्याचे 2014 साली लग्न झाले होते. या लग्नापासून त्यांना सहा वर्षाची मुलगी देखील आहे. दोघांचे आयुष्य खुप सुरळीत चालू होते. पती-पत्नी (Husband-Wife) आणि मुलगी असे तिघांचे आयुष्य खुप सुंदर सुरु होते. हे आयुष्य आणखीणच आनंदीदायी होण्यासाठी त्यांनी 2020 ला कार देखील घेतली होती. या कारनंतर घडलेल्या घटनेने पतीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
Palghar: बॉयफ्रेंडला झाडाला बांधलं अन् गर्लफ्रेंडवर केला गँगरेप
रोज रात्री कार हॉटेलला पार्क
पती हा प्रायव्हेट कंपनीत (Private Company) काम करायचा. त्यामुळे त्याची शिफ्ट नेहमीच बदलत राहायची. एका आठवड्यात त्याची नाईट शिफ्ट लागली होती. यावेळी नाईट शिफ्टवेळी त्याची कार कोणीतरी चालवत असल्याचे निदर्शनास आले होते. कार जीपीएसशी कनेक्ट (GPS connect) असल्याने त्याला हा संपुर्ण प्रकार कळाला होता. त्यामुळे त्याच्या नकळत कार कोण चालवत आहे? असा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे याची चौकशी करण्याचे त्याने ठरवले होते.
हे वाचलं का?
हॉटेलमध्ये जाऊन चौकशी
पतीने त्याची कार रोज रात्री एका हॉटेलबाहेर अनेक तास उभे असल्याचे जीपीएसमध्ये (GPS connect) दिसून आले होते. आणि हीच कार सकाळी 5 वाजताच्या दरम्यान त्याच्या घराजवळ पोहोचली होती. त्यामुळे हा काय प्रकार सुरु होता, याची त्याला कल्पनाच येत नव्हती.त्यामुळे त्याने ते हॉटेल गाठून चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या रात्री त्याला हा प्रकार कळाला, त्याच पहाटे तो हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याला चौकशीत धक्कादायक बाब कळाली.
अॅम्बेसीच्या लेडीज टॉयलेटमध्ये गुप्त कॅमेरा, 60 व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…
हॉटेलमधून धक्कादायक माहिती
पतीला चौकशीत धक्कादायक माहिती कळाली. एक महिला आणि पुरुष त्या गाडीतून हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये रूम घेताना दोघांनी आपले आयडेंटी कार्ड दिले होते. या आयडेंटी कार्डमधून पतीला आपल्या पत्नीची ओळख पटली, तसेच अनैतिक संबंधांचा भांडाफोड झाला.विशेष म्हणजे या घटनेत गाडी जीपीस ट्रॅकवर होती, याची माहिती पत्नीला नव्हती. त्यामुळे या प्रकरणात तिचे जीपीएसमुळे बिंग फुटले होते
ADVERTISEMENT
दरम्यान बंगळुरूत ही घटना घडली आहे. या प्रकरणात आता पतीने पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात पोलिस ठाण्यात (Police) तक्रार दिली आहे. तसेच दोघांनाही कोर्टात देखील खेचले आहे. या प्रकरणात कोर्टात सध्या केस सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT