Manoj Jarange : प्रकाश आंबेडकर, बच्चू कडूंचं घेतलं नाव; जरांगे पाटील काय बोलले?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Manoj Jarange patil Latest News in marathi : Jarange drink water after prakash ambedkar request
Manoj Jarange patil Latest News in marathi : Jarange drink water after prakash ambedkar request
social share
google news

Manoj Jarange Patil Hunger Strike Latest Update : मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांची आहे. पण, उपोषण सुरू केल्यानंतर आता त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहे. जरांगे पाटलांनी पाणी तरी प्यायला हवे, अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे. यातच प्रकाश आंबेडकरांनीही जरांगे पाटलांना एक विनंती केली होती. त्यावर जरांगे पाटलांनी भमिका मांडली.

ADVERTISEMENT

अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांशी बोलताना जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी (३० ऑक्टोबर) जरांगे पाटील एक ग्लास पाणी प्यायले. पण, त्यापूर्वी त्यांनी त्याचं कारणही सांगितलं.

हे ही वाचा >> Maratha Reservation : आरक्षणासाठी कराव्या लागतील ‘या’ गोष्टी, भोसले समिती अहवालात काय?

जाळपोळी मागे सरकारचा हात?

राज्यात होत असलेल्या जाळपोळीच्या घटनांमागे कुठेतरी सरकारचाच हात असल्याची शंका येतेय असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. ‘हे आंदोलन चिघळवण्यासाठी सत्ताधारी जाळपोळ करताहेत असा तुमचा आरोप आहे. तुमचं उपोषण थांबवण्यासाठी हे केलं जातंय का, तुमचं मत काय आहे? असा प्रश्न जरांगेंना विचारण्यात आला.

हे ही वाचा >> Hemant Patil : मराठा आरक्षणासाठी शिवसेना नेत्याने दिला खासदारकीचा राजीनामा

त्याबद्दल बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “सत्ताधाऱ्यांनी दुप्पट जरी धिंगाणा केला, तरी मी उपोषण थांबवू शकत नाही. फक्त शंका अशी असते की, आम्ही काय सांगितलं की आपण त्यांच्या दारात जायचं नाही आणि त्यांनी आमच्या दारात यायचं नाही. मग आपण त्यांच्या दारात कसे जातो? याचा अर्थ त्यांचेच लोक असू शकतात. सामन्य मराठे आमच्या गावात त्यांना येऊ देणार नाही.”

मराठा आंदोलकांना जरांगेंनी काय केलं आवाहन?

“सगळ्यांना विनंती आहे की, जाळपोळ झालेली घटना कानावर येऊ देऊ नका ही हात जोडून विनंती. शांततेत हे युद्ध जिंकू. माझी तब्येत बघून तुम्हाला राग असेल, पण तुम्ही शांत रहावं म्हणून मी ग्लासभर पाणी पितो”, असे जरांगे पाटील मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन करताना म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर, बच्चू कडूंबद्दल जरांगे पाटील काय बोलले?

“समाजाचा मान राखून पाणी घेतो. प्रकाश आंबेडकरांनी एक पत्र पाठवलं आहे, पाण्यासाठी… त्यांचाही सन्मान करणं गरजेचं आहे. एक ग्लास पाणी घेतो. बच्चू कडूंही आपल्या परस्पर तिकडे आवाज उठवत आहेत. त्यांच्यासाठी मिळून, सगळ्यांसाठी मिळून मी एक ग्लास पाणी घेतो. तुमचा सन्मान ठेवतो. पण, जातीला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे, हे तुम्ही थोडं समजून घ्या”, अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT