तुरुंगातून सुटलेल्या गजा मारणेला पुन्हा अटक, शक्तीप्रदर्शन भोवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खुन खटल्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा जेलमधून पुण्याकडे जात असताना काढलेल्या जंगी मिरवणूकीमुळे चर्चेत आलेला प्रख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गजा मारणे आणि त्याच्या काही साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे आणि नजिकच्या परिसरात मारणे टोळीची चांगलीच दहशत आहे. या टोळीचा गुंड गजा मारणेला काही महिन्यांपूर्वी खुन खटल्यात अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

परंतू तळोजा जेलमधून सुटल्यानंतर मारणे समर्थकांनी गजा मारणेची मिरवणूक काढली. एक्स्प्रेस हायवेवर निघालेल्या या मिरवणूकीत जवळपास ५०० हून अधिक गाड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी टोलनाक्यावरुन जाताना टोल बुडवून या गाड्या पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. उर्से टोल नाक्यापर्यंत गजा मारणेची ही मिरवणूक सुरु होती. एखाद्या खुन खटल्यात जेलमध्ये असलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक काढणं हे एकाप्रकारे पोलीय यंत्रणेला आव्हान दिल्यासारखचं होतं. यानंतर कोथरुडमधील पौड रोड येथील आपल्या घरी पोहचल्यानंतर गजा मारणेवर कोवीडच्या परिस्थितीत जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

कोणत्या प्रकरणात गजानन मारणेला झाली होती अटक??

हे वाचलं का?

पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्याप्रकरणी गजा गावडेला २०१४ साली अटक करण्यात आली होती. मारणे आणि त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळपासून मारणे तुरुंगात होता. सुरुवातीच्या काळात मारणेला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्याची रवानगी कोल्हापूर जेलमध्ये करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्याला तळोजा जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT