PM Narendra Modi: "भारताच्या राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिला..."; संविधानाच्या उत्सवात पंतप्रधान मोदींचं मोठं विधान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा हा खूप मोठा क्षण.."

point

"मदर ऑफ डेमोक्रेटिक अशी भारताची ओळख..."

point

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Narendra Modi Speech In Loksabha:  "जेव्हा जी-20 समिट झालं, त्यावेळी आम्ही महिलांच्या सशक्तीकरणाचा विचार मांडला. आता पुढे जाण्याची गरज असल्याने आम्ही महिला सशक्तीकरणाला महत्त्व दिलं. आम्ही सर्व खासदारांनी मिळून नारीशक्ती बंधन अधिनियम पारित केलं. महिला शक्तीला भारतीय लोकशाहीत भागिदारी निश्चित करण्यासाठी आम्ही पावलं उचलली. प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिला असतात. आपण संविधानाचे 75 वर्ष साजरे करत आहोत, हा चांगला संयोग आहे की, भारताच्या राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिला विराजमान आहे. या सदनातही महिला खासदारांची संख्या वाढत आहे. त्यांचं योगदानाही वाढत आहे. मंत्रिपरिषदेतही त्याचं योगदान वाढत आहे. आज सामाजिक, राजकीय, शिक्षण, खेळ विभाग, क्रिएटीव्ह वर्ल्ड, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान, महिलांचं प्रतिनिधित्व देशाला गौरव देणारा राहिला आहे, असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलं. ते संविधानाच्या 75 व्या उत्सवानिमित्त संसदेत बोलत होते.

ADVERTISEMENT

मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा हा खूप मोठा क्षण आहे. संविधानाचा 75 वर्षांचा प्रवास आणि जगातील सर्वात महान लोकशाहीचा प्रवास आहे. हे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक उत्सव साजरा करण्याचा हा क्षण आहे. संसदही या उत्सवात सामील झालीय, याचा मला आनंद आहे. मी सर्व खासदारांचे आभार व्यक्त करतो. ज्यांनी या उत्सवात सहभाग घेतला. मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो. 75 वर्षांची उपलब्धता साधारण नाहीय. असाधारण आहे. देश जेव्हा स्वतंत्र झाला, भारत मदर ऑफ डेमोक्रेटिक म्हणून ओळखलं जातं. सर्व शंकांना दूर करत संविधान आपल्याला इथपर्यंत घेऊन आलं. हजार वर्षांच्या भारताच्या संस्कृतीबद्दल संविधान निर्माते सजग होते. भारत केवळ विशाल लोकशाही देश नाही, तर लोकशाहीची जननी आहे, असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलं. दिल्लीत कालपासून संविधानाबाबत संसदेत विशेष चर्चा सुरु आहे. 

हे ही वाचा >> Kangana Ranaut: PM नरेंद्र मोदी का भेटतात बॉलिवूड सेलिब्रिटींना? कंगना राणौतनं दिलं खळबळजनक उत्तर, म्हणाली...

आपल्या देशातील नारीशक्तीने संविधानाला मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. संविधान सभेत 15 महिला सदस्या होत्या आणि त्या सक्रिया सदस्या होत्या. सर्व महिला वेगवेगळ्या क्षेत्रातील होत्या. संविधानात त्यांनी जे जे उपाय सांगितले, त्या गोष्टींचा संविधानाच्या निर्माणावर खूप मोठा प्रभाव राहिला होता. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, जगातील अनेक देश स्वतंत्र झाले. पण महिलांना अधिकार देण्यात दशक लागले होते. पण आपल्या इथे सुरुवातीपासूनच महिलांना मतदानाचा अधिकार दिला होता, असंही मोदी म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Allu Arjun Released : तुरूंगाबाहेर येताच अल्लू अर्जुन म्हणाला ज्या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झाला, त्यांना...

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT