ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन झाल आहे. वाऱ्यावरची वरात या नाटकात त्यांनी केलेली भूमिका आणि सिंहासन सिनेमात त्यांनी केलेली भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा शंतनू मोघे आणि सून प्रिया मराठे असं कुटुंब आहे. श्रीकांत मोघे यांनी साठहून अधिक नाटकांमध्ये आणि पन्नासपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पुलकित आनंदयात्री या […]
ADVERTISEMENT
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन झाल आहे. वाऱ्यावरची वरात या नाटकात त्यांनी केलेली भूमिका आणि सिंहासन सिनेमात त्यांनी केलेली भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा शंतनू मोघे आणि सून प्रिया मराठे असं कुटुंब आहे. श्रीकांत मोघे यांनी साठहून अधिक नाटकांमध्ये आणि पन्नासपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पुलकित आनंदयात्री या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, दुबई, युरोप या ठिकाणीही दौरे केले आहेत. श्रीकांत मोघे ९१ वर्षांचे होते. ६ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे झाला होता.
ADVERTISEMENT
श्रीकांत मोघे यांचं दहावीपर्यंतच शिक्षण किर्लोस्करवाडी या ठिकाणी झालं होतं. महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत झालं. बीएससी साठी ते पुण्याच्या महाविद्यालयात होते. मुंबईत त्यांनी बी आर्च ही पदवीही घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे यांनी ६० हून जास्त नाटकांमध्ये काम केलं आहे. आपल्या नाट्य प्रवासावर श्रीकांत मोघे यांनी नटरंगी रंगलो हे आत्मचरित्रही लिहलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांची प्रतिमा चॉकलेट हिरो अशी होती. ‘अजून यौवनात मी’, ‘अशी पाखरे येती’, ‘अंमलदार’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गरुडझेप’, ‘तुझे आहे तुझपाशी’, ‘मृत्यूंजय’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘सौदामिनी’ या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. गरुडझेप या नाटकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तर मृत्यूंजय या नाटकात ते दुर्योधनाची भूमिका साकारत. वाऱ्यावरची वरात या नाटकातलं त्यांचं दिल देके देखो मुझे मत रोको हे गाणं त्या काळात सगळ्यांच्या स्मरणात राहिलं होतं.
ADVERTISEMENT
उंबरठा, काका मला वाचवा, दोन्ही घरचा पाहुणा, सिंहासन, कालचक्र, सूत्रधार, रास्ता रोको, प्रपंच या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या. प्रपंच हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमाला राष्ट्रपती पदकही मिळालं होतं. अजून चांदरात आहे, अवंतिका, उंच माझा झोका, स्वामी या टीव्ही मालिकांमध्येही श्रीकांत मोघे यांनी काम केलं होतं. स्वामी या मालिकेतील त्यांनी साकारलेली राघोबादादांची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
ADVERTISEMENT
श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार
काशीनाथ घाणेकर पुरस्कार
केशवराव दाते पुरस्कार
गदिमा पुरस्कार
झी मराठी जीवन गौरव पुरस्कार
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार
नानासाहेब फाटक पुरस्कार
प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार
या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. एक हरहुन्नरी कलाकार अशी त्यांची ओळख होती. आज वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.स
ADVERTISEMENT