Chandrashekhar Patil: शिवराज पाटील चाकूरकरांच्या चुलत भावाची गोळ्या झाडून आत्महत्या
Latur suicide : लातूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकुरकर (Shivraj patil chakurkar) यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या (Suicide ) केली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर (Latur news ) लातूर शहरात एकच खळबळ उडाली. (Chandrashekhar patil chakurkar ) चंद्रशेखर उर्फ […]
ADVERTISEMENT
Latur suicide : लातूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकुरकर (Shivraj patil chakurkar) यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या (Suicide ) केली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर (Latur news ) लातूर शहरात एकच खळबळ उडाली. (Chandrashekhar patil chakurkar ) चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील चाकूरकर असं शिवराज पाटील यांच्या चुलत भावाचं नाव होतं. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला आहे. Shivraj Patil Chakurkar’s cousin shot and committed suicide
ADVERTISEMENT
‘गीतेमध्येही जिहादची गोष्ट’; काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं विधान वादात, भाजपची टीका
चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील यांनी. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूरमधील देवघर येथील निवासस्थानी स्वतःवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 9 वाजता त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला. मात्र चंद्रशेखर पाटील यांनी असा टोकाचा पाऊल का उचलला याबाबत आणखी अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. चाकूरकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या चुलत भावाने आत्महत्या का केली असावी, अशा चार्चाना उधाण आले आहे.
चंद्रशेखर पाटील यांच्याकडे होता बंदुकीचा परवाना
पोलीस घटनास्थळी पोहचले असून घटनेचा पंचनामा करीत आहेत. आत्महत्येमागचं कारण काय, याबाबत माहिती घेतली जात आहे. चंद्रशेखर पाटील हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. त्यांचं वय 81 वर्ष असून ते शेती करत होते. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे बंदुकीचा परवाना देखील होता, अशी माहिती मिळत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मागील काही दिवसांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते, असं देखील कळतंय.
लातूर: सासऱ्याने केला जावयाचा खून; नंतर स्वतःच्याच लॉजमध्ये गळफास लावून केली आत्महत्या
ADVERTISEMENT
शिवराज पाटील हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी सक्रिय राजकारणात असताना काँग्रेसमध्ये विविध पदे भूषविली आहे. त्यांनी देशाचं केंद्रीय गृहमंत्रीपद देखील भूषविले आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याच्या चुलत भावाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
आत्महत्येआधी सर्वांना केला ‘गुड बाय’चा मॅसेज
चंद्रशेखर चाकूरकर पाटील यांनी आधीच आत्महत्या करण्याचा निश्चय केला असावा असं बोललं जात आहे. कारण त्यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना आपल्या कॉन्टॅक्टमधील लोकांना ‘गुड बाय’ असा मॅसेज केला होता.तर व्हॉट्सअप स्टेटसला देखील ‘गुड बाय’ असं लिहून पोस्ट केलं होतं. त्यानंतर स्वतःकडील असलेल्या पिस्तुलने गोळ्या झाडून आत्महत्या केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT