Mumbai Crime News : 20 वर्षीय महिलेवर अत्याचार, स्टेशनवर बेशुद्धावस्थेत आढळली महिला, नराधम रिक्षा चालक?
Mumbai Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा राम मंदिर स्टेशनजवळ ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. यानंतर महिलेला केईएम रुग्णालयात दाखल करून तपासणी करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील राम मंदिर स्टेशनवर बेशुद्धावस्थेत आढळली तरूणी

तरूणीवर रिक्षा चालकाकडून अत्याचार?

डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समोर आल्या धक्कादायक गोष्टी
Mumbai Crime News:मुंबईतील वनराई पोलीस स्टेशन परिसरात एका 20 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकाने मुलीवर बलात्कार केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा शोध घेत आहेत. मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या परिसरात पीडिता बेशुद्ध अवस्थेत आढळली.
ही वाचा >> Ajit Pawar meets Sharad Pawar : मुंबईत शिंदे विरूद्ध ठाकरे दंड थोपटत असताना पुण्यात दोन्ही पवारांची बंद दाराआड चर्चा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा राम मंदिर स्टेशनजवळ ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. यानंतर महिलेला केईएम रुग्णालयात दाखल करून तपासणी करण्यात आली. (Mumbai Crime news)यादरम्यान, डॉक्टरांनी मुलीच्या गुप्तांगातून सिझेरियन ब्लेड आणि काही दगड काढले अशी माहिती समोर आलेली आहे. मात्र, याबद्दल खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही.
हे ही वाचा >> Ulhasnagar Crime News : शेजारी राहणाऱ्या बाप-बेट्यांकडून चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पीडित मुलगी तिच्या पालकांसोबत नालासोपारा परिसरात राहते. वनराई पोलिसांनी अज्ञात ऑटोचालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.