नवरात्रीआधीच 'त्या' चार तरुणींचा Video तुफान व्हायरल! झाडाखाली नटून थटून गरबा खेळायल्या गेल्या अन्...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Beautiful girls dance video clip viral
Girls Garba Dance Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चार तरुणींचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ का होतोय सोशल मीडियावर व्हायरल?

point

नवरात्रीआधीच या तरुणींच्या व्हिडीओची होतेय तुफान चर्चा

point

झाडाखाली गेल्यावर तरुणींनी नेमकं काय केलं?

Young Gilrs Garba Video Viral, Navratri Utsav : गणपती उत्सवाचा समारोप झाल्यानंतर सर्वांना वेध लागले आहेत नवरात्री उत्सवाचे. उद्या घटस्थापनेचा पुजेचा मुहूर्त असून नवरात्रीसाठी अनेक महिलांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. नवरात्री उत्सव म्हटलं की गरब्याचा जल्लोष आलाच. नवरात्रीत अनेक तरुणी गरबा खेळून लोकांचं मनोरंजन करतात. पण आता चार तरुणींचा गरबा खेळतानाचा भन्नाट व्हिडीओ नवरात्रीआधीच व्हायरल झाला आहे. चार तरुणींना नवरात्रीचे वेध लागले असून त्यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. या मुली नटून थटून एका झाडाखाली गरबा खेळण्यासाठी गेल्या. पण त्यानंतर असं काही घडलं जे पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. (After the celebration of Ganpati Utsav, everyone is preparing for Navratri Utsav)

'त्या' तरुणींचा व्हिडीओ का होतोय व्हायरल?

नवरात्री उत्सवाची धामधूम सुरु होण्याआधीच चार तरुणींच्या डान्सने धुमाकूळ घातला आहे. कारण या तरुणींनी बॉलिवूडचं सर्वात लोकप्रीय गाणं 'ढोलिदा'वर भन्नाट डान्स केला आहे. या तरुणींनी कोणत्याही डान्स फ्लोअर, गर्दीच्या ठिकाणी किंवा स्टुडिओत डान्स केला नाही. तर निसर्मरम्य वातावरणात एका झाडाच्या खाली या तरुणी ढोलिदा गाण्यावर थिरकल्या आहेत. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! दिवाळी करा दणक्यात साजरी, सरकारने दिली खूशखबर 

या व्हिडीओत पाहू शकता की, या तरुणी ढोलिदा गाण्यावर फ्री स्टाईल डान्स करत आहेत. तरुणींच्या व्हायरल व्हिडीओमुळं नेटकऱ्यांनाही डान्सची भुरळ पडली असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वेदवी सवालिया नावाच्या यूजरने तरुणींचा या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 50 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसच नेटकऱ्यांनी या पोस्टला सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Viral Video : खतरनाक! एका हाताने पंखा थांबवतो आणि भक्तांना लगेच...; लड्डू मुत्या बाबा आहे तरी कोण?

नवरात्रीच्या दिवशी रंगांचं विशेष महत्त्व असतं. कारण हे भक्तांना देवीच्या वेगवेगळ्या रुपांना जोडतात. प्रत्येक रंग देवीच्या विशेष गुणांना दर्शवतो. प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ आणि महत्त्व असतं. या रंगांना धारण केल्यानं देवीची कृपा होते आणि जीवनात सकारात्मक उर्जा येते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेचं पहिलं रुप शैलपुत्रीची पूजा केली जाते. 3 ऑक्टोबरला गुरुवारचा दिवस असल्याने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा केल्यानं लाभ होईल. पिवळा रंग आशा आणि प्रसन्नतेचा प्रतिक आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT