Thane Crime : 7 महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला, नंतर प्रकार लपवण्यासाठी आरोपीने नातेवाईकांसोबत...
Ulhasnagar : अल्पवयीन मुलगी सरकारी रुग्णालयात उपचार घेत असल्यानं, पोलिसांना याची माहिती मिळाली. आता पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या नातेवाईकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शेजाऱ्यानं वारंवार अत्याचार केल्यामुळे तरूणी गर्भवती?

आरोपीने नातेवाईकांसोबत मिळून रचलं षडयंत्र

घटना लपवण्यासाठी आरोपीने थेट..
Ulhasnagar Crime : गेल्या 4 दिवसांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे महाराष्ट्र अक्षरश: हादरला आहे. पुण्यात घडलेल्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळळी होती. त्यानंतर आता उल्हासनगरमध्येही अशीच एक चीड आणणारी घटना घडली आहे.एका सात महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तिचा गर्भपात करून गर्भ जमिनीत पुरला. ही घटना समोर आल्यानंतर उल्हासनगर हादरलं आहे.
हे ही वाचा >>Crime News : लग्न पुढे ढकलल्यामुळे तरूणाला राग आला , तरूणीच्या ऑफिसमध्ये जाऊन केला हल्ला...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला होता. यामुळे ती अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिली. आरोपीला हे कळताच आरोपीने आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यानंतर तिचा 7 व्या महिन्यात गर्भपात झाला. पण हे कोणालाही कळू नये म्हणून, आरोपीने एका ठिकाणी जाऊन गर्भ जमिनीत पुरला.
हे ही वाचा >>Washim मध्ये 24 तासात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आईसस्क्रीम देण्याच्या बहाण्याने दुकानात घेऊन जात...
अल्पवयीन मुलगी सरकारी रुग्णालयात उपचार घेत असल्यानं, पोलिसांना याची माहिती मिळाली. आता पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या नातेवाईकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय, त्यांनी गर्भपात करून जमिनीत गाडलेल्या अर्भकाचेही डीएनए नमुने घेतले आहेत. त्यामुळे चौकशीनंतरच ही घटना समोर येणार आहे.