Ajit Pawar : "तुम्हाला खुर्ची वाचवता आली नाही, त्याला मी काय करू?" भर पत्रकार परिषदेत दादांचा शिंदेंना टोला

मुंबई तक

पत्रकार परिषदेत झालेल्या टोल्यांच्या जुगलबंदीनंतर फडणवीस म्हणाले, एवढ्या उन्हात शीतयुद्ध कसे होऊ शकतं? आमच्यात सगळं काही 'ठंडा ठंडा, कूल कूल' आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार, एकनाथ शिंदेंमध्ये जुगलबंदी

point

भर पत्रकार परिषदेत तुफान टोलेबाजी

point

"महायुतीत सगळं ठंडा-ठंडा, कूल-कूल"

Ajit Pawar Vs Eknath Shinde : राज्यात आजपासून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांची पत्रकार परिषद पार पडली.  या पत्रकार पुन्हा एकदा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातली टोलेबाजी पाहायला मिळाली. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावरुन शिंदे आणि अजित पवार दोघेही बोलताना दिसले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 'मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची'बद्दल आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली, त्यानंतर एकच हशा पिकला होता.

हे ही वाचा >>Crime : सगळेच बहिणीवर प्रेम करतात म्हणून, 13 वर्षाच्या मुलाने 'रमन राघव' चित्रपट पाहून बहिणीला संपवलं

पत्रकार परिषदेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पहिल्या तीन मिनिटांत सरकारच्या कामांबद्दलची माहिती आणि आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही सर्व आधीसारखेच आहोत. माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फक्त 'मुख्यमंत्रीपदाची खुर्ची' बदलली आहे, पण अजित दादा (अजित पवार) एकाच खुर्चीवर आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही ताण नाही. यावर अजित पवारांनी गंमतीने म्हटले की, जर तुम्ही तुमची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवू शकला नाही तर मी काय करू.

शिंदे यांनी लगेच स्पष्ट केलं की, हे सर्व परस्पर समंजसपणाने घडत आहे. यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंमतीने म्हटले की ही आमच्यातील 'रोटेटींग अंडरस्टँडींग' आहे.

आमच्यात सगळं काही 'ठंडा ठंडा, कूल कूल'

हे ही वाचा >>Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, सुरक्षारक्षकाला कॉलर धरून धक्काबुक्की, प्रकरण काय?

दरम्यान, शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यातल्या जुगलबंदीनंतर, पत्रकारांनी महायुतीतील फुटीबद्दल विचारलं असता, फडणवीस म्हणाले की, तुम्ही तुमच्या ब्रेकिंग न्यूजसाठी आम्हाला कितीही लढवण्याचा प्रयत्न केला तरी आमची युती तुटणार नाही. फडणवीस म्हणाले, एवढ्या उन्हात शीतयुद्ध कसे होऊ शकतं? आमच्यात सगळं काही 'ठंडा ठंडा, कूल कूल' आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp