THAR नव्हे, आनंद महिंद्रांनी थेट विमानच बनवलं, VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले
Anand Mahindra Viral Video: महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करून आनंद महिंद्रा लोकांना प्रेरित करत असतात. त्यांनी केलेले व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आनंद महिंद्रांच्या त्या व्हिडीओनं इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ
आनंद महिंद्रांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
महिंद्रांच्या व्हिडीओला लाखोंच्या संख्येत मिळाले व्यूज
Anand Mahindra Viral Video: महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करून आनंद महिंद्रा लोकांना प्रेरित करत असतात. त्यांनी केलेले व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. कारण या व्हिडीओंमध्ये असलेल्या बारीक सारीक गोष्टीही लोकांना प्रेरणा देत असतात. पण महिंद्रांनी एक्सवर आता एक आगळावेगळा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.
ADVERTISEMENT
व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस
आनंद महिंद्रा यांनी @anandmahindra या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, मुलांना आताही यात रस आहे की नाही, माहित नाही. परंतु, मी जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा एक पेपर प्लेन बनवलं जायचं. दूरवर जाणारं विमान बनवणं एकप्रकारचा छंदच होता. मी त्यावेळी असं डिझाईन पाहिलं असतं, तर नक्कीच स्पर्धा जिंकली असती.
हे ही वाचा >> लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार ४००० रुपये? CM शिंदेंनी ठेवली एक अट
महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असून आतापर्यंत या व्हिडीओला २ लाख ९४ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.
व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बालपणीच्या आठवणींना उजाळा देत एका यूजरने म्हटलं, या व्हिडीओनं माझं हृदय नक्कीच जिंकलं आहे. कारण यो पोस्टमुळं त्या दिवसांची आठवण झाली, ज्या क्षणांचा आम्ही खूपच आनंद लुटला होता. दुसऱ्या यूजरने म्हटलं, त्यावेळी दोन पंखांचं विमान खूप चर्चेत होते. एक पंखाच्या विमानांच्या तुलनेत खूप मोठी भरारी घ्यायचे. खूपच कमी लोक या विमानांना अचूकपणे बनवत होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> PAK vs BAN: "ये खांद्यावरून हात..."; पाकिस्तानच्या संघात पडली वादाची ठिणगी? तो VIDEO व्हायरल
आनंद महिंद्रा लोकांना प्रेरणादायी ठरतील असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. लाखोंच्या संख्येत आनंद्र महिंद्रा यांचे चाहते आहेत. सामाजिक, राजकीय, क्रीडा, साहित्यीक किंवा विज्ञान क्षेत्र असो, जो कुणी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतो, त्या व्यक्तीला आनंद महिंद्रा त्यांची आवडती महिंद्रा थार गाडी बक्षिस म्हणून देत असतात. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अनेकांना आनंद महिंद्रांनी मोठी बक्षिस दिल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT