Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी 17 लाखांची सुपारी, आरोपींनी वापरला पेपर स्रे; चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासे
दोन महिने वाट पाहूनही हल्ला करण्यासाठी संधी साधता न मिळाल्यानं आरोपी परेशान झाले होते. पण 12 ऑक्टोबरला त्यांनी वेळ साधली. जर त्या दिवशी प्लॅन यशस्वी झाला नसता, तर हे काम सोडून आरोपी निघून गेले असतो असं शार्पशूटर शिवकुमार गौतमने सांगितलं
ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी राज्याला हादरवून सोडणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाच्या चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विशेष मकोका न्यायालयात मुंबई गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल झाले, यामधून हे खुलासे झालेत. आरोपपत्रानुसार, हत्येसाठी 17 लाख रुपयांची सुपारी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारांना देण्यात आली होती. या गुन्ह्यात बिश्नोई गँगची मोठी भूमिका होती.
तपासात अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर हे महत्त्वाचे ठरले आहेत. यांनीच गुजरातमधील कर्नाटक बँकेच्या आनंद शाखेत आरोपी सलमान वोहराच्या नावाने उघडलेल्या खात्यांद्वारे पैसे पाठवले होते. या खात्यातील पैसे वापरण्याचं काम लोणकरवर सोपवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील बिश्नोई गँगच्या स्लीपर सेलने कट रचणाऱ्यांकडे असलेल्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले.
हे ही वाचा >> Jitendra Awhad : "हभप वाल्मिक कराडवर 22 गुन्हे, त्यातील सात गुन्हे 307 चे", आरोपांची मालिका सुरूच, आव्हाडांचं खळबळजनक ट्विट
पैसे हस्तांतरित करण्यासाठी कॅश डिपॉझिट मशीनचा (सीडीएम) वापर करण्यात आला. 60 ते 70 टक्के निधी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून आला असं समोर आलंय.तसंच या पैशांचा थेट हवाला नेटवर्कशी संबंध असल्याचंही समोर आलंय. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक संबंध कुणापर्यंत जातात हे सध्या तपास यंत्रणा शोधत आहेत. आरोपपत्रात गोळीबार करणाऱ्यांनी केलेल्या प्लॅनिंग आणि रेकीबद्दलचीही माहिती समोर आली आहे. शार्पशूटर शिवकुमार गौतमकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन महिने वाट पाहूनही हल्ला करण्यासाठी योग्य वेळ न मिळाल्यानं ते परेशान झाले होते. पण 12 ऑक्टोबरला त्यांनी वेळ साधली. जर त्या दिवशी प्लॅन यशस्वी झाला नसता, तर हे काम सोडून आरोपी निघून गेले असतो.
हे ही वाचा >>तिरुपती बालाजी मंदिरात टोकन घेताना चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू
13 हजारांना घेतला पेपर स्प्रे
आरोपपत्रात असं म्हटलंय की, गोळीबारानंतर पोलीस पाठलाग करतील अशी शक्यता आरोपींना वाटत होती. त्यावेळी पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी 13 हजार रुपयांचा पेपर स्प्रे खरेदी केला होता. गुरमेल सिंगने पाठलाग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर स्प्रे वापरल्याचं यामधून स्पष्ट झालं.