Bhaskar Jadhav : "जायचं त्यांना जाऊद्या म्हणण्यापेक्षा...", साळवींच्या निर्णयानंतर भास्कर जाधवांचा स्वपक्षीयांना सल्ला
राजन साळवी भाजपात जाणार होते, पण कुणी खोडा घातला माहिती नाही. शिवसेनेतही त्यांच्या पक्ष प्रवेशाला अडचणी येऊ शकतात. मी त्यांना आवाहन करतो, आहात तिथे थांबा असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राजन साळवींच्या निर्णयानंतर काय म्हणाले भास्कर जाधव?

राजन साळवी यांनी स्वपक्षीयांना काय सल्ला दिला?

राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशात कुणी खोडा घातला?
राजन साळवी हे आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते ठाकरेंना धक्का देणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांनी निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचं ठरवलं. यावरुनच आता त्यांच्या राजकीय सहकारी भास्कर जाधव यांनी मात्र, स्पष्ट भूमिका घेतली आहे. भास्कर जाधव यांनी यावेळी राजन साळवींवर निशाणा साधलाच, मात्र स्वपक्षीयांनाही टोला मारला आहे.
"राजन साळवींनी थाबावं..."
हे ही वाचा >> मूड ऑफ द नेशन: महाराष्ट्रात मविआचं काही खरं नाही, सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे
आमचे मित्र राजन साळवींनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला, ते शिंदेंच्या शिवसेनेत जातील अशी चर्चाय. राजन साळवी नाराज होते, तेव्हा आम्ही चर्चाही केली. त्यांनी ठाकरेंसमोर मन मोकळं केलं. ज्यांच्यावर नाराजी होती, त्याचंही समाधान करण्याचा प्रयत्न केला. नंतर ते शांत झाल्यामुळे आहेत त्या ठिकाणी थांबतील असं कळवलं. मात्र, ते आता पुन्हा वेगळा निर्णय घेतायत. भाजपात जाणार होते, पण कुणी खोडा घातला माहिती नाही. शिवसेनेतही त्यांच्या पक्ष प्रवेशाला अडचणी येऊ शकतात. मी त्यांना आव्हान करतो, आहात तिथे थांबा, बाळासाहेबांची पुण्याई संपलेली नाही, आपण ती पुण्याई नव्या पिढीसमोर मांडून पुन्हा पक्ष उभा करू असं भास्कर जाधळ म्हणाले.
भास्कर जाधव यांनी स्वपक्षीयांना काय सुनावलं?
भास्कर जाधव यावेळी बोलताना असंही म्हणाले की, जातील त्यांना जाऊद्या असं सांगण्यापेक्षा, कुठे चाललात? तुमचे परतीचे दोर कापलेले आहेत, हे सांगण्याची वेळ आलेली आहे. खंदकात पडून मारण्यापेक्षा इथेच थांबा, आपण लढू आणि बाळासाहेबांची पुण्याई उभी करू हा आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांनाही अप्रत्यक्षपणे सुनावलं.
हे ही वाचा >>MOTN: देशात आज निवडणुका झाल्यास BJP ला मिळतील 'एवढ्या' जागा, पाहा कोणाचं येईल सरकार
दरम्यान, राजन साळवींसारखा जुना साथीदार ठाकरेंच्या साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. मात्र, रत्नागिरीमध्येही या घडामोडींचे वेगळे परिणाम घडताना दिसत होते. सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यात वाद असल्याचं दिसत होतं. मात्र, काल एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत दोघांचीही समजूत काढली आणि शेवटी दोघांनाही एकाच गाडीने गरी पाठवलं. राजन साळवी आज ठाण्यात मोठ्या शक्तिप्रदर्शनासह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी काल रात्री सामंत आणि साळवींनी माध्यमांशी संवाद साधला.