Uddhav Thackeray तोंडाच्या वाफा काढू नका; हिंमत असेल तर.. : बावनकुळे

योगेश पांडे

ADVERTISEMENT

chandrashekhar bawankule replied to uddhav thackeray
chandrashekhar bawankule replied to uddhav thackeray
social share
google news

Nagpur | Chandrashekhar bawankule :

ADVERTISEMENT

नागपूर : उद्धव ठाकरे यांना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना 50 वेळेला काँग्रेस (Congress) पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याने त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं. त्यानंतर भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. आता जर ठाकरेंमध्ये धमक असेल, तर त्यांनी लगेच काँग्रेसपासून दूर होतं असल्याचं जाहीर करावं. धमक असेल तर काँग्रेसची साथ सोडल्याचं जाहीर करावं, नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका, एकदा तरी ठाकरेपणा दाखवा. असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी दिलं. ते नागपूरमध्ये बोलत होते. (Bjp state president Chandrashekhar Bawankule replied to Uddhav Thackeray)

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावमध्ये शिवगर्जना सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यांवरुन जाहीरपणे सुनावलं. राहुल गांधींंना माझं एक सांगणं आहे, सावरकर आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सोबत लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही. सावरकरांनी जे केलं ते येऱ्या गबाळ्याच काम नाही. या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्याला फाटे फोडू नका. अन्यथा आपला देश हुकुमशाहीकडे गेलाच म्हणून समजा, असं ठाकरे म्हणाले होते. यावरुनच आता बावनकुळे यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Uddhav Thackeray : सावरकरांवरुन राहुल गांधींना जाहीर सुनावलं, काय म्हणाले?

आम्ही २०० जागा लढवू : बावनकुळे

कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपला तातडीने निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं होतं. यावर बावनकुळे म्हणाले, जे ठाकरे कधीही लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाहीत. मागच्या दारातून विधानपरिषद गेले. ते उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात? ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही, त्यांनी निवडणूकीच्या गप्पा मारू नये.. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील 200 जागा जिंकू.

हेही वाचा : Uddhav Thackeray : “भाजप मिंधेंच्या नेतृत्वात लढणार का? हिंमत असेल तर…” ठाकरेंनी दिलं आव्हान!

तुम्ही तुमचा कूळ बुडविला : बावनकुळे

शिंदे गटाला आपण 48 जागा देणार आहोत, आपल्याला भरपूर स्कोप आहे, असं बावनकुळे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावर ठाकरेंनी बावनकुळेंना “अहो बावनकुळे तुमच्या नावाप्रमाणे मिंधे गटाला किमान 52 तरी जागा द्या”, असं म्हणतं उपहासात्मक टोला लगावला होता. यावर आता बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या ज्या कुळाला उंची दिली होती. तो तुम्ही बुडविला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचं नाव बुडवतं आहात, असा टोला त्यांनी लगावला.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Uddhav Thackeray : “त्यासाठी सावरकर व्हा”, राहुल गांधींवर घणाघाती टीका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT