CM Eknath Shinde Nandgaon Sabha : मुख्यमंत्री शिंदेंच्या नांदगावच्या सभेत महिलांना कोंडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिकमध्ये काल मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेत काय घडलं?

point

पोलिसांकडून महिलांना सभास्थळी कोंडण्याचा प्रयत्न?

point

बाहेर पडणाऱ्या महिलांना काय म्हणाले पोलीस?

CM Eknath Shinde Nashik : नाशिक जिह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी सुहास कांदे गेल्यावेळीपेक्षा जास्त लीडने निवडून येतील आणि विरोधकांच्या डोळ्यातून पाणी काढतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्यक्त करण्यात आला. मात्र दुसरीकडे आता सभेतल्या आणखी एका प्रकाराची चर्चा होते आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणासाठी आलेल्या लोकांना संभास्थळीच कोंडून ठेवण्यात आल्याचं दिसतंय. 

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>CM Eknath Shinde: "गुंडा असावा असा, ज्याच्या हातात असावा बाळासाहेबांचा...", शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

 

शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी नांदगावमधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेवेळी आलेल्या महिलांना जबरदस्तीने आत बसण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचं दिसून आलं. या सभेनंतर समोर आलेल्या व्हिडीओमधून लोकांना थेट कोंडून घेण्यात आल्याचं दिसतंय. तरीही हा नेमका प्रकार काय हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हिडीओमध्ये काय दिसलं? 

नांदगावमधील सभेनंतर काही व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये सभास्थळावरुन बाहेर निघालेल्या लोकांना पोलीस दबाव टाकून आतच थांबण्यास सांगताना दिसतायत. बोलावलं कोणी होतं तुम्हाला? कशाला आला होतात? बसा आता मध्येच असं पोलीस म्हणतायत. तर महिला त्यांना विनंती करतायत की, मुलं रडतायत, वेळ झाली असं म्हणत महिला पोलिसांना बाहेर पडू देण्यासाठी विनंती करत होत्या. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय, की पोलिसांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव असलेलं गेट बंद केलेलं होतं. काही लोक गेटवर ताटकळत पडले होते, तर दुसरीकडे बाजूच्या भिंतीवरुन महिला, वृद्ध नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. 


हे ही वाचा >>Sharad Pawar Madha : "सगळ्यांचा नाद करायचा, पण...", शरद पवारांचं उघड उघड चॅलेंज!


दरम्यान, नांदगावमध्ये झालेल्या या सभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेवंरही निशाणा साधला. सुहास कांदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिंदेंनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. "ठाकरे येऊन गेले. सुहासला म्हणाले गुंड आहे. गुंड आहे ना आपण..हा बाळासाहेबांचं सच्चा शिवसैनिक आहे. गुंडा असावा असा, त्याचा हातात असावा बाळासाहेबांचा भगवा झेंडा. तो बाळासाहेबांचा भगवा झेंडा सुहासच्या हातात आहे. पुत्र व्हावा असा गुंडा, त्याचा हातात असावा बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा. माझ्यासह सुहासने बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा घेतलाय. सुहास त्यांच्याबरोबर होता तेव्हा चांगला होता आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेला आणि तो गुंड झाला. पण तुम्ही तर दरोडेखोर आहात," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT