Crime : सगळेच बहिणीवर प्रेम करतात म्हणून, 13 वर्षाच्या मुलाने 'रमन राघव' चित्रपट पाहून बहिणीला संपवलं

पेल्हार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4:30 वाजता श्रीराम नगर टेकडीवर मुलीचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चुलत भावानेच केली बहिणीची हत्या

point

बहिणीवरच सगळे प्रेम करत असल्याचा समज

point

रागात मुलाने बहिणीला संपवून टाकलं

Palghar Crime News : पालघरमधून एक अशी घटना समोर घडली आहे, जी ऐकून तुमचाही थरकाप उडेल. एका 13 वर्षाच्या मुलाला हत्येच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं आहे. एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, एका सिरीयल किलरचा हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर मुलाने निष्पाप 6 वर्षांच्या मुलीची हत्या केली.

आरोपी मुलीचा चुलत भाऊ

पेल्हार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4:30 वाजता श्रीराम नगर टेकडीवर मुलीचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वानकुटे यांनी सांगितलं की, 'आम्ही या प्रकरणात नालासोपारा येथील एका 13 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं आहे. आरोपी मृत मुलीचा चुलत भाऊ आहे. कुटुंबातील सर्वजण मुलीचे जास्त लाड करतात असं त्याला वाटल्यानं त्याने मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. 'सीसीटीव्हीमध्ये मुलगा मुलीला घेऊन जात असल्याचंही दिसून आलं.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार घातला, पण त्यांना संधी...", CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

शनिवारी संध्याकाळी मुलगी बेपत्ता झाली, त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. जवळच्या एका कंपनीच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मुलगा मुलीला कुठेतरी घेऊन जाताना दिसतो. त्या मुलाने सुरुवातीला पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्याने सत्य कबूल केले.

दगडाने डोके फोडलं

'रमन राघव' हा सिरीयल किलर चित्रपट पाहिल्यानंतर मुलाने मुलीचा गळा दाबून खून केला आणि नंतर दगडाने तिचा चेहरा ठेचला. भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे वानकुटे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp