कामाची बातमी: खरं की काय.. आधार कार्डची पण असते Expiry Date? पाहा UIDAI चं उत्तर

मुंबई तक

Aadhaar Card Expiry: युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, आधार कार्डची एक्सपायरी डेट असते की नाही हे आपण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
आधार कार्डची पण असते Expiery Date?
social share
google news

मुंबई: आधार कार्ड म्हणजेच प्रत्येक भारतीयाच्या ओळखीचं महत्त्वपूर्ण दस्तऐवज. बँकिंग, मोबाइल सिम, वेगवेगळ्या सरकारी योजना तसेच इनकम टॅक्स फाइलिंग यांसारख्या सर्वच कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य बनले आहे. मात्र, आधार कार्डची एक्सपायरी डेट (Expiry Date) असते का? काही वर्षांनंतर हे पुन्हा बनवावे लागते का? असे बरेच प्रश्न अनेकांच्या मनात येतात. याच प्रश्नाचं निरसन आम्ही करणार आहोत. 

आधार कार्डची वैधता सीमा असते का? 

युनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)यांच्यानुसार, आधार कार्डची कोणतीच एक्सपायरी डेट नसते. हे कार्ड आयुष्यभरासाठी मान्य असते. म्हणजेच, हे पुन्हा बनवण्याची गरज नसते. मात्र, काही बाबतीत आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं असतं.

हे ही वाचा>> Aadhar Card हरवलंय? काळजी कसली करताय? घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा नवीन!

लहान मुलांचं आधार कार्ड अपडेट करावं लागतं का?

जर तुमच्या मुलाचं वय 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि त्याचं आधार कार्ड बनवलं असेल तर UIDAI च्या नियमांनुसार मुलांच्या आधारकार्डला दोन वेळा अपडेट करणं गरजेचं असतं.

पहिल्यांदा: मुल 5 वर्षांचं झाल्यानंतर
दुसऱ्यांदा: मुल 15 वर्षांचं झाल्यानंतर

जर मुलांचं आधार कार्ड या दोन्ही कालावधीत अपडेट केलं गेलं नाही तर ते अमान्य ठरु शकतं. 

लहान मुलाच्या आधार कार्ड अपडेटमध्ये नेमकं काय होतं?

मुलाचं आधार कार्ड अपडेट करताना त्याचं नवी बायोमेट्रिक डिटेल्स जसे की फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅनिंग आणि फोटो पुन्हा घेतला जातो. विशेष बाब म्हणजे आधार अपडेटची ही पूर्ण प्रक्रिया मोफत असते. म्हणजेच, 5 वर्ष आणि 15 वर्ष वयामध्ये आधार अपडेटसाठी कोणतेच शुल्क लागत नाही.

हे ही वाचा>>  Ladki Bahin Yojana : 'त्या' 27 लाख अर्जदार महिलांना बसणार धक्का, 3000 रूपये जमा होणार की नाही?

10 वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक असतं का?

जर तुम्ही 10 वर्षांपासून तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तरीदेखील ते अमान्य होत नाही. आधार कार्ड आयुष्यभर वैध असते, असे UIDAI कडून स्पष्ट करण्यात आले आहे. भविष्यात आधार कार्ड संबंधी कोणत्या समस्या येऊ नयेत म्हणून सरकार हे वारंवार अपडेट करण्याचा सल्ला देते. 

वरिष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेटची प्रक्रिया आणि शुल्क

वरिष्ठ नागरिकांना आपल्या आधार कार्डमध्ये आपलं नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल नंबर किंवा बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी सामान्य शुल्क द्यावं लागतं. आधार अपडेटची ही प्रक्रिया आधार सेवा केंद्र (Aadhaar Seva Kendra) वर करता येते.  खरंतर, आधार कार्डची कोणतीच एक्सपायरी डेट नसते आणि ते लाइफटाइम वैध राहते. याव्यतिरिक्त लहान मुलांचे आधारकार्ड निश्चित वयामध्ये अपडेट करणं अनिवार्य असते. तसेच, वयस्कर मंडळींनी वेळोवेळी आधार डिटेल्स अपडेट करणं गरजेचं आहे जेणेकरुन भविष्यात कोणत्याच सरकारी किंवा वित्तीय कामकाजात अडथळा येऊ नये.

हे वाचलं का?

    follow whatsapp