Exclusive Interview: 'महाराष्ट्राप्रमाणे इथेही BJP मुख्यमंत्री म्हणून...', प्रशांत किशोरांच्या विधानाने खळबळ

मिलिंद खांडेकर, मॅनेजिंग एडिटर

Exclusive interview Prashant Kishor: जर बिहारमध्ये NDA चा विजय झाला तरी भाजपवाले आपला स्वत:चा मुख्यमंत्री बनवतील. ज्या प्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात केलं.. तेच काम ते इथेही करतील. असं मोठं विधान प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

प्रशांत किशोरांच्या विधानाने खळबळ
प्रशांत किशोरांच्या विधानाने खळबळ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिहारच्या मुख्यमंत्री पदाबाबत प्रशांत किशोरांचं मोठं विधान

point

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर उतरले रिंगणात

point

निवडणूक जिंकल्यास महाराष्ट्रप्रमाणे बिहारमध्ये भाजप आपलाच मुख्यमंत्री करेल असा प्रशांत किशोरांचा दावा

पटना: बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका (Bihar Vidhansabha Election) होणार आहेत. यासंदर्भात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी बिहारमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचे मोठे दावे करत आहे. दरम्यान, आतापर्यंत निवडणूक लढवणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जनसुराज पक्षाची स्थापना केली आहे आणि निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्याच वेळी, त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदी कोण असणार याबाबत एक मोठं विधान केलं आहे.

इंडिया टुडे ग्रुपच्या Tak चॅनेलचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी बिहारमधील जन सूरज पक्षाचे शिल्पकार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी बिहारच्या राजकीय समीकरणांवर, एनडीएची भूमिका आणि काँग्रेसच्या दाव्यांवर सविस्तर चर्चा केली. त्याचवेळी प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक महत्त्वाचं विधान केलं.

हे ही वाचा>> "2029 ला देशाच्या पंतप्रधानपदी...", देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

'महाराष्ट्रप्रमाणेच बिहारमध्येही भाजप मुख्यमंत्री म्हणून...'

प्रश्न: तुम्ही जे म्हणत आहात की नोव्हेंबरनंतर नीतीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री राहणार नाहीत... 

असा प्रश्न जेव्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रशांत किशोर यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, 'या मागचं कॉमन लॉजिक हे आहे की, एक तर जर बिहारमध्ये NDA चा पराभव झाला तर नीतीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत.' 

'चला समजू या की, एनडीए जिंकू शकतं. पण जरी NDA चा विजय झाला तरी भाजपवाले आपला स्वत:चा मुख्यमंत्री बनवतील. ज्या प्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात केलं.. तेच काम ते इथेही करतील. कारण नीतीश कुमार यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती ही अशी राहिलेली नाही की, ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. ते आता फक्त निवडणुकीपर्यंतच...'

'एका प्रकारे भाजप आता त्यांना मुखवटा बनवून पुढे करत आहेत फक्त... एकदा की निवडणूक निघाली तर त्यानंतर नवा मुख्यमंत्री बनवतील.' असं मोठं विधान प्रशांत किशोर यांनी केलं होतं.  

मागील बिहार निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नीतीश कुमार यांचं नाव घोषित करत युतीत निवडणूक लढवली होती. पण आता तसं होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

'बिहारचे लोक मूर्ख नाहीत'

दरम्यान, याच मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर पुढे म्हणाले की,  'जेव्हा लालूजी गरिबांचे नेते म्हणून उदयास आले आणि सामाजिक न्यायाचा नारा देऊन पुढे आले तेव्हा 1995 मध्ये जनतेने त्यांना पूर्ण बहुमत दिले. पण जेव्हा त्याच लालूजींचे नाव चारा घोटाळ्यात आले तेव्हा लोकांना त्यांच्या राजवटीत जंगलराज दिसू लागले. 1995 नंतर आजपर्यंत लालूजी कधीही बिहारचे नेतृत्व करू शकले नाहीत. तसंच त्यांचा पक्ष सत्तेत जरी राहिला तरी त्याला कायम युतीच करावी लागली. त्यामुळे बिहारचे लोक इतके मूर्ख नाहीत.

हे ही वाचा>> राहुल गांधींनी महाराष्ट्राचा 'तो' मुद्दा का धरलाय लावून? क्रोनोलॉजी समजून घ्या!

त्याचप्रमाणे, 2010 मध्ये बिहारच्या जनतेने नितीशजींना 117 जागा जिंकून दिल्या, कारण 2005 ते 2010 पर्यंत नितीशकुमार काही कामं करताना दिसत होते. भाजपचा स्ट्राइक रेट 90 होता, त्यांनी 101 जागा लढवल्या होत्या आणि 90 जागा जिंकल्या होत्या. हा भाजप आणि नितीश कुमार यांचा स्ट्राईक रेट आहे, नितीश कुमार यांचा स्ट्राईक रेट 40 झाला आहे. भाजपचा स्ट्राईक रेट 60 झाला आहे. दोघांची युती सारखीच होती. सामाजिक समीकरणही तसेच होते.

अशा परिस्थितीत, बिहारमध्येही अशाच पद्धतीने मतदान होते असे गृहीत धरले पाहिजे. याचा अर्थ बिहारमधील लोकांच्या राजकीय आणि सामाजिक विचारसरणीला अधोरेखित करणे असा आहे. 

प्रशांत किशोर यांची संपूर्ण मुलाखत इथे पाहा...

हे वाचलं का?

    follow whatsapp