Eknath Shinde : स्वत:ला संपवलेल्या शिरीष महाराजांच्या कुटुंबासाठी धावले एकनाथ शिंदे, अख्खं कर्ज फेडलं
तुकोबारायांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी पाच फेब्रुवारीला त्यांच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिरीष महाराज यांनी केली आत्महत्या

सुसाईड नोटमध्ये कर्ज असल्याचा केला होता उल्लेख

एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, कर्ज फेडलं
संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली होती. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या करताना त्यांनी ४ पानी सुसाईड नोट देखील लिहीली होती. या नोटमध्ये त्यांनी त्यांच्यावरील कर्जाचा उल्लेख केला होता. ही घटना समताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोरे कुटुंबियांच्या मदतीला पुढे आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिरीष मोरे यांचं 32 लाखांचं कर्ज फेडलं आहे. शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.
हे ही वाचा >> India's Got Latent मध्ये हे चाललंय तरी काय? कॉमेडीच्या नावानं अश्लील बोलला रणवीर अलाहाबादिया?
पाच फेब्रुवारीला शिरीष महाराज मोरे यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. शिरीष यांनी आत्महत्येपूर्वी चार पाणी सुसाईड नोट लिहीली होती. या नोटीमध्ये त्यांनी त्यांच्या कर्जाचा उल्लेख देखील केला होता. त्याचबरोबर समाजाने त्यांचं कर्ज फेडण्यासाठी पुढे यायला हवं असं देखील त्यांनी त्या नोटमध्ये म्हटलं होतं.
ही घटना समजल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबियांना तात्काळ मदत करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना शिंदेंनी मोरे कुटुंबियांना भेटण्यासाठी पाठवलं आणि मदत सुपूर्त केली. शिंदेंनी मोरे यांचं ३२ लाखांचं कर्ज नैतिकता म्हणून फेडल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis राज ठाकरे यांच्या भेटीला, राऊत म्हणाले शिवाजी पार्कवर कॅफे उघडलाय...
एकनाथ शिंदे नेहमीच अनेकांच्या अडचणीत काळात केलेल्या मदतीसाठी ओळखले जातात. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून देखील त्यांनी अनेकांना मदत केली होती.