ओठांचं चुंबन, जीभही… दलाई लामा यांच्या वादग्रस्त व्हिडीओने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

dalai lama kisses minor on lips asks suck tongue
dalai lama kisses minor on lips asks suck tongue
social share
google news

Dalai Lama kissing child video :दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दलाई लामा एका अल्पवयीन मुलाला चुंबन करतानाचा आणि त्याला जीभेला जीभेने स्पर्श करायला लावणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर येताच मोठा वाद सुरु झाला आहे.सोशल मीडियावर देखील या व्हिडिओवरून तिखट प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान ही पहिलीच वेळ नव्हे जेव्हा दलाईलामा वादात सापडले आहे. याआधी देखील ते अनेकदा वादात सापडले होते, ही प्रकरणे कोणती होती, ती जाणून घेऊयात. (dalai lama kisses minor on lips asks suck tongue video viral)

ADVERTISEMENT

व्हिडिओत काय?

या व्हायरल व्हिडिओत एक अल्पवयीन मुलगा दलाई लामा (Dalai Lama) यांना आदर देण्यासाठी नतमस्तक होतो. या दरम्यान धर्मगुरू त्याच्या ओठाचे चुंबन घेतात. त्यानंतर व्हिडिओत जीभेला जीभेने स्पर्श करू शकतो का? असे अल्पवयीन मुलाला विचारताना दिसत आहेत. ट्विटर युझर जोस्ट ब्रोकर्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला जोस्ट ब्रोकर्स लिहतो की, दलाई लामा एका बौद्ध कार्यक्रमात भारतीय मुलाचे चुंबन घेतात आणि नंतर त्याला जीभेला जीभेने स्पर्श करायला लावतात. विशेष म्हणजे व्हिडिओत ते जीभेला जीभेने स्पर्श करू शकतो का ? असे अल्पवयीन मुलाला विचारताना दिसत आहेत. कोणी सांगू शकतो असे दलाई लामा का करतायत? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : ‘प्रेम एकतर्फी नसतं’, असं म्हणत शिक्षा भोगत असलेल्या तरुणाने जेलमध्ये गळफास लावला

सोशल मीडियावर वाद

दलाई लामा (Dalai Lama) यांचा हा व्हिडिओ व्हाय़रल झाल्य़ानंतर सोशल मीडियावर वाद पेटला आहे. नेटकऱ्यांनी या व्हि़डिओवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दलाई लामा यांचे असे वागणे हे अजिबात समर्थनीय नाही आहे, अशी प्रतिक्रिया दीपिका पुष्कर हिने दिली आहे.हे काय पाहतो मी? या प्रकरणासाठी त्यांना अटक केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जस ओबेरॉयने दिली आहे.

हे वाचलं का?

‘या’ प्रकरणातही वादात

दलाई लामा (Dalai Lama) यांनी 2019 साली एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर ते मोठ्या वादात सापडले होते. जर माझी उत्तराधिकारी एक महिला असेल, तर तिला आकर्षक असले पाहिजे, असे विधान दलाई लामा यांनी एका मुलाखतीत केले होते.त्याच्या या विधानावरही खुप टीका झाली होती.त्यानंतर त्यांनी वादग्रस विधानाप्रकरणी माफी मांगितली होती.

हे ही वाचा : गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 25 लाख हुंडा… विमानतळावर पोहोचताच नवऱ्याने काढला पळ

बीजिंगने दलाई लामावर तिबेटमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचाही आरोप केला आहे. भारत, नेपाळ, कॅनडा आणि युएससह 30 देशामध्ये राहणाऱ्या सुमारे 1,00,000 निर्वासित तिबेटींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय तिबेट प्रशासनाला मान्यता देत नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT