Dhananjay Munde Resigns : अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा, रात्री उशिरा झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली होती?

मुंबई तक

Dhananjay Munde Resignation : सगळं मंत्रिमंडळ बरखास्त केलं, तरी माझ्या भावांना मारणाऱ्यांना मारलं तरच आम्ही त्यांच्याबद्दल बोलू, अन्यथा बोलणार नाही. आज आम्ही मरणाच्या दारात आल्यावर तुम्ही राजीनामा घेता का? असा सवाल संतोष देशमुख यांनी केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून महाराष्ट्र हादरला

point

धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला

point

देवेंद्र फडणवीस यांनी रात्री दिले होते आदेश

Dhananjay Munde Resigns : संतोष देशमुख यांची हत्या करताना घडलेल्या संपूर्ण राक्षसी कृत्यानंतर महाराष्ट्र संतापला आहे. अत्यंत निघृणपणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली, छळ करण्यात आला. तसंच त्यांच्या मृतदेहासोबतही विटंबाणा केली गेली असल्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सुरुवातीपासूनच राजीनामा देण्यासाठी दबाव होता, मात्र त्यांनी राजीनामा दिला नव्हता. अखेर काल संपूर्ण घटनेचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र संतापला आणि राजीनामा द्यावा लागला. (Dhananjay Munde Resigns)

हे ही वाचा >> Dhananjay Deshmukh : गृहमंत्रालयाला सगळे फोटो, सगळी घटना माहिती होती, एवढे दिवस का थांबले?

मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांची त्यांच्या मुंबईतील देवगिरी येथील निवासस्थानी भेट घेतली, या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. देशमुख यांच्या हत्येचे फोटो माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर चर्चा झाली. मुख्यमंत्र्‍यांनी तेव्हाच मुंडेंचा राजीनामा घ्यायला सांगितल्याची माहिती होती. 

त्यानंतर आज सकाळी विधानसभा अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधीपक्ष नेत्यांसह अनेकांनी या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला. तसंच धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्वांकडून होत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला गेला, त्यानंतर हा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला.

हे ही वाचा >> Sushma Andhare : "आजचे फोटो बघितल्यानंतर त्या राक्षसांचे चेहरे...", संतोष देशमुखांचे फोटो पाहिल्यावर अंधारे हादरल्या

धनंजय देशमुख म्हणाले, एवढी वाट का पाहिली? 

गृहमंत्रालयाला ही सगळी घटना माहिती होती, सगळे फोटो माहिती होते, एवढे दिवस कसे थांबले? माणसं आहे की कोण आहे? असं म्हणत धनंजय देशमुख यांनी गृहविभागावर सवाल उपस्थित केला. "सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, आरोपी कोण आहे, यांना कोण सांभाळत होतं, यांनी सगळं आयुष्यच सगळे डील करत काढलं.  या संपूर्ण प्रकरणात 150 लोक आहेत. गृहमंत्रालयाच्या नाकावर टीच्चून आरोपी क्रमांक एक हजर झाला" अशा संतप्त भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या. नीच लोकांनी याचं समर्थन केलं, मोर्चे काढले, आंदोलन केले. यांना कधीच वाटलं नाही असं धनंजय देशमुख म्हणाले.





 

हे वाचलं का?

    follow whatsapp