Rajan Salvi : शिवसेनेत प्रवेशापूर्वी शिंदेंनी वाद मिटवला, सामंत आणि साळवींना एकाच गाडीतून घरी पाठवलं
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळामध्ये त्यांच्या सोबत मी जाऊ शकलो नाही असं राजन साळवी यांनी सांगितलं. साळवी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एकनाथ शिंदेंनी मिटवली सामंत-साळवींमधला वाद

रात्री उशिरापर्यंत चालली बैठक

शेवटी सामंत बंधू-राजन साळवी एकाच गाडीतून घरी
Rajan Salvi : ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का बसला असून, राजन साळवींसारखा जुना साथीदार ठाकरेंच्या साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. मात्र, रत्नागिरीमध्येही या घडामोडींचे वेगळे परिणाम घडताना दिसत होते. सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्या वाद असल्याचं दिसत होतं. मात्र, काल एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत दोघांचीही समजूत काढली आणि शेवटी दोघांनाही एकाच गाडीने गरी पाठवलं. राजन साळवी आज ठाण्यात मोठ्या शक्तिप्रदर्शनासह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी काल रात्री सामंत आणि साळवींनी माध्यमांशी संवाद साधला.
राजन साळवी शिंदेंबद्दल काय म्हणाले?
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळामध्ये त्यांच्या सोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो असं साळवींनी सांगितलंय.
हे ही वाचा >> मूड ऑफ द नेशन: महाराष्ट्रात मविआचं काही खरं नाही, सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे
शिंदेंचा मी आशीर्वाद घेतला. आजच्या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री उदय सामंत,आ. किरण सामंत आम्ही एकत्र बसलो आमच्या मतदारसंघातील जिल्हा संदर्भातील ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या बाबत चर्चा झाल्या त्या ठिकाणी सर्व चर्चा सकारात्मक झाल्या आहेत असं राजन साळवी म्हणाले आहेत.
हे ही वाचा >> 'ठाकरे हे शरद पवार, आशा भोसलेंना पण गद्दार बोलतील...' शिंदेंच्या मंत्र्याची जहरी टीका
राजन साळवी पुढे बोलताना असंही म्हणाले की, सामंत बंधू आणि मी सुद्धा समाधानी आहोत. आम्हा सर्वांना एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात देऊन. संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल. एकत्र काम करून अभिवचन दिलेला आहे.उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होईल याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे असंही राजन साळवी यांनी सांगितलं आहे.