Ulhasnagar Crime News : शेजारी राहणाऱ्या बाप-बेट्यांकडून चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबई तक

Ulhasnagar Chocolate Luring crime: पीडित मुलीची आई घरकामासाठी दुसऱ्याच्या घरी जाते. तिचे वडील रोजंदारीवर काम करतात. पीडितेचे पालक कामावर गेल्यानंतर, शेजारी राहणाऱ्या आरोपीने पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाप-बेट्यांनी केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

point

उल्हासनगरमध्ये संतापजनक घटना

point

आरोपी बाप-बेटे पोलिसांच्या ताब्यात

Shocking incident in Ulhasnagar: गेल्या काही दिवसात राज्यात महिला अत्याचाराच्या हादरवून सोडणाऱ्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा उल्हासनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या वडील आणि मुलाने अत्याचार केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बुधवारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वडील आणि मुलाला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा >>Shiv Sena UBT: 'आम्ही औरंगजेबाला गाडलंय, अमित शाह हे किस झाड़ की..' उद्धव ठाकरेंची तुफान टीका

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई घरकामासाठी दुसऱ्याच्या घरी जाते. तिचे वडील रोजंदारीवर काम करतात. पीडितेचे पालक कामावर गेल्यानंतर, शेजारी राहणाऱ्या आरोपीने पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवलं. यानंतर, 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मजूर वडिलांनी पीडितेवर अत्याचार केले.

हे ही वाचा >>Eknath Shinde : "...तर आपल्या सर्वांची पाठ बाळासाहेबांनी थोपटली असती", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

बुधवारी पोटात दुखत असल्यानं मुलीच्या आईला संशय आला. तेव्हा आईने मुलीला विचारलं असता, हा प्रकार उघडकीस आला. शेजारी राहणाऱ्या एका वडील आणि मुलाने मिळून मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Ulhasnagar crime news)अल्पवयीन मुलगा आणि वडिलांविरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यासोबतच या दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. आरोपी मुलगा 12 वर्षांचा अल्पवयीन असल्यानं त्याला बाल सुधारगृहात पाठवलं जाईल, असं सांगितलं जातंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp