Baramati News : अभ्यास करत नाही म्हणून बापाची मारहाण, मुलाचा मृत्यू; अंत्यसंस्काराआधीच पोलिसांनी...

मुंबई तक

मुलाचा मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर बापाने नातेवाईकांना बोलावलं आणि पुरावे नष्ट करण्यासाठी थेट अंत्यसंस्काराची तयारी केली. तेव्हाच तिथे पोलीस पोहोचले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीच्या होळ गावात बापाने मुलाला मारलं

point

मुलगा अभ्यास करत नाही म्हणून अमानूष मारहाण

point

मारहाण करत गळा दाबल्यानं मुलाचा मृत्यू

Baramati Hol Crime News : बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होळ गावमध्ये राहणाऱ्या नऊ वर्षीय पियुष विजय भंडलकरची त्याच्याच वडिलांनी हत्या केली. मुलगा अभ्यास करत नसल्यानं वडिलांना राग यायचा. अशाच रागात त्यांनी फुलासारख्या मुलाचं डोकं भिंतीवर आपटलं आणि त्याचा गळा दाबला. यावेळी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मुलाला मृत घोषित करण्यात आलं. ही घटना 14 जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी घडली. त्यानंतर ही संपूर्ण घटना लपवण्याचा प्रयत्न नराधम बापाने करण्यात आला. मात्र, वडगाव निंबाळकर पोलिसांनी हत्येचे गूढ उकलले असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत पियुषचे वडील विजय गणेश भंडलकर, मृताची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर यांच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Saif Ali Khan Case : "सैफ हल्लेखोराला भिडला म्हणून जहांगीर...", करीना कपूरचा वांद्रे पोलिसांना जबाब

"तू अभ्यास करत नाही, बाहेर खेळत राहतो, तू तुझ्या आईच्या पावलावर पाऊल ठेवतोय, तुझ्यामुळे माझं नाव खराब होतंय " असं म्हणत पित्यानं आपल्या लेकाला मारमार मारलं. रागात त्याने थेट मुलाचा गळा दाबला आणि जमिनीवर फेकलं. यावेळी भिंतीवर आदळल्यानं मुलाचा मृत्यू झाला. पियुषची आजी हे सर्व पाहत होती, पण तिने नातवाला मारणाऱ्या मुलाला थांबवलं नाही. तसंच त्यानंतर आजीने पियुष बेशुद्ध झाल्याची खोटी माहिती सर्वांना दिली आणि घडलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला.

संतोष भंडलकर हे जेव्हा पीयूषला रुग्णालयात घेऊन गेले, आरोपीच्या बापाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी पीयूष बेशुद्ध झाल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पीयूषला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पण, त्याला तिथे न नेता आणि गावातील पोलीस पाटलांना किंवा इतर कोणालाही मृतदेहाची माहिती न देता, त्यांनी नातेवाईकांना बोलावलं आणि पुरावे नष्ट करण्यासाठी शवविच्छेदन न करता अंत्यसंस्काराची तयारी केली. 

हे ही वाचा >> Saif Ali Khan Case : रेल्वेने पळून गेला आरोपी? पोलिसांकडून तपासले जातायत लोकल आणि एक्सप्रेसमधले CCTV

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि पियुषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीला नेला. त्यानंतर पोलिसांनी वडिलाची चौकशी केली. यावेळी पियुषची हत्या झाल्याचे समोर आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp