Crime : मुलीशी मैत्री केली, खासगी क्षणांचे फोटो काढले, तेच फोटो नंतर ब्लॅकमेल करायला वापरले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई तक

आरोपीने मुलीचे वैयक्तिक खासगी फोटो आपल्याकडे घेतले आणि नंतर तिला धमकावू लागला. जर आपलं ऐकलं नाही तर, हे फोटो तुझ्या कुटुंबाला दाखवेल अशा धमक्या त्याने दिल्या होत्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई पोलिसांनी नाशिकमधून केली आरोपीला अटक

point

पीडितेला खासगी फोटो वापरुन करत होता ब्लॅकमेल

point

आरोपी करतो फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील एका 23 वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. आरोपीवर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिचे खासगी फोटो वापरून ब्लॅकमेल करण्याचा आणि धमकावण्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षापासून पीडितेचा मानसिक छळ केला जात होता. शेवटी, तिने हिंमत करुन पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर सोमवारी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >>SYSTRA : मुंबई उच्च न्यायालयाचा MMRDA ला दणका, फ्रेंच कंपनी सिस्ट्रासोबत करारावर करावा लागणार पुनर्विचार

पीडित मुलगी आणि आरोपी 2024 मध्ये सोशल मीडियावर मित्र बनले. हळूहळू, आरोपीने मुलीचे वैयक्तिक खासगी फोटो आपल्याकडे घेतले आणि नंतर तिला धमकावू लागला. जर आपलं ऐकलं नाही तर, हे फोटो तुझ्या कुटुंबाला दाखवेल. जर सोबत नाही राहिली तर मी आत्महत्या करेल आणि तुझ्यावर आरोप करेल अशा धमक्या आरोपी देत होता.

हे ही वाचा >>महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटलांनी घेतली बावनकुळेंची भेट, वाचा Inside स्टोरी

अटक केलेला आरोपी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याचा रहिवासी आहे. फूड डिलिव्हरी बॉय म्हणून तो काम करतो. आरोपीनं पीडितेचे फोटो ब्लॅकमेलिंगसाठी वापरले. मुंबई पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून, तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. प्राथमिक चौकशीत त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड आढळलेला नाही. सध्या तो पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp