H3N2, H1N1 अन् कोरोना: एकाचवेळी 3 रोगांचा धोका… जाणून घ्या फरक, लक्षणं, उपचार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : H3N2, Covid-19, H1N1म्हणजेच स्वाईन फ्लूमुळे भारतात संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या H3N2 ची अनेक प्रकरणं समोर येत असली तरी, भारतात स्वाईन फ्लू आणि कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे 4 हजार 623 सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय 28 फेब्रुवारीपर्यंत H1N1 च्या एकूण 955 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. (H3N2, H1N1 and Corona : Learn the difference, symptoms and treatment)

ADVERTISEMENT

H1N1 चे हे सर्व रुग्ण तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आढळून आले आहेत. याशिवाय 2 जानेवारी ते 5 मार्च 2023 या कालावधीत H3N2 वेरिएंटच्या 451 रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, H3N2 प्रकारामुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, आसाममध्ये अलीकडे H3N2 च्याही रुग्णांची नोंद झाली आहे.

H3N2, Covid-19, H1N1 हे सर्व श्वसनाशी संबंधित आजार आहेत. पण अशा परिस्थितीत त्यांची लक्षणं कशी ओळखायची आणि तुम्हाला कोणता संसर्ग झाला आहे हे कसं ओळखायचं आणि त्यावर कसे उपचार करायचे असा प्रश्न हमखास पडतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

H1N1 आणि H3N2 :

H1N1 याला स्वाईन फ्लू म्हणूनही ओळखलं जातं. हा आजार एक इन्फ्लूएंझा विषाणूप्रमाणेच प्राण्यांमध्ये होणाऱ्या रोगांमुळे होतो. तसंच हवामान बदलामुळे लोकांना फ्लू आणि सामान्य पद्धतीची सर्दीही होते. पण या आजारामुळे शरीराला धोका पोहोचत नाही.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सुमारे 200 ते 300 प्रकारच्या विषाणूंमुळे सर्दीमध्ये सामोरं जावं लागतं. प्रत्येक व्हायरसचा स्वतःचा सबटाईप आणि वेरिएंट असतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, सामान्य सर्दीची समस्या राईनोवायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस, इन्फ्लूएंझा टाइप A आणि टाइप B व्हायरसमुळे उद्भवते.

ADVERTISEMENT

आरोग्य तज्ञांच्या मते, H3N2 च्या वाढत्या प्रकरणांमुळे लोक आधीच चिंतेत होते. अशात पुन्हा एकदा कोविड 19 च्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

ADVERTISEMENT

H3N2 Virus : भारतात H3N2 विषाणूचे 2 बळी, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

ही आहेत लक्षणं :

एकीकडे श्वसनासंबंधिच्या समस्या असलेले काही रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काही लोकांमध्ये, विशेषत: अशा लोकांमध्ये अतिशय गंभीर लक्षणं दिसून येतात, जे वृद्ध आहेत, त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा जे आधीच काही गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. या सर्व संसर्गामध्ये ताप, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी, कफ आणि घसा खवखवणे अशी काही लक्षणे सामान्य असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते या सर्व विषाणूंची लक्षणं एकसारखी आहेत.

अशा परिस्थितीत, तुम्हाला सामान्य सर्दी किंवा H3N2, Covid-19, स्वाइन फ्लू आणि H1N1 आहे की आणखी काही हे शोधणे खूप कठीण होते. पण काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन तुम्ही त्यांच्यातील फरक ओळखू शकता.

– H3N2 मुळे आवाजात जडपणाचा जाणवतो.

– दुसरीकडे, कोविड-19 ची सुरुवात ताप आणि वास कमी होण्याने होते.

– फ्लूमुळे संपूर्ण शरीर आणि स्नायूंमध्ये खूप वेदना होतात.

– फ्लूमुळे कोरड्या खोकल्याचा त्रास बरेच दिवस जाणवतो.

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की कोविड-19 ची काही लक्षणे, जी इन्फ्लूएंझा ए विषाणूने ग्रस्त लोकांमध्ये फार क्वचितच दिसून येतात. यात वास आणि अन्नाची चव कमी होणे आणि संपूर्ण शरीरावर पुरळ उठणे यांचा समावेश आहे.

h3n2 Maharashtra: महाराष्ट्रात पहिला बळी, नागपूरमध्येही संशयिताचा मृत्यू

तुम्हाला कोणत्या विषाणूचा संसर्ग झाला आहे हे कसे शोधायचे?

नॅसोफॅरिंजियल स्वॅब, ऑरोफरींजियल स्वॅब आणि नॅसोफरींजियल वॉशद्वारे तुम्ही कोविड-19 आणि फ्लू ओळखू शकता. याशिवाय या दोन्ही संसर्गाचा शोध घेण्यासाठी तुम्ही रॅपिड टेस्टचीही मदत घेऊ शकता.

बर्‍याच वेळा, लोकांमध्ये H1N1 आणि H3N2 ची लक्षणे दिसतात आणि ते कोविड-19 समजतात. अशा परिस्थितीत लोकांना त्यांची कोविड चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. जाणकारांच्या मते H1N1 आणि H3N2 ची चाचणी एकाच प्रकारची आहे, त्यामुळे हे दोन्ही विषाणू केवळ एकाच चाचणीने शोधता येतात.

काय करावे

तुम्ही ताप आणि खोकला इत्यादी फ्लूच्या काही लक्षणांसाठी वेदनाशामक, नेब्युलायझर घेऊ शकता, असं आरोग्य तज्ञ सुचवतात. यासोबतच, घरी राहून विश्रांती घेणे आणि घरी बनवलेले साधे अन्न खाणे, तसंच स्वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. फ्लू टाळण्यासाठी तुम्ही कोविड नियमांचं पालन करणं महत्त्वाचे आहे. फ्लूशी संबंधित समस्या टाळण्यासाठी, आपण इन्फ्लूएंझा लसीकरण घेणे महत्वाचे आहे. तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणे आणि स्वतःच्या इच्छेने प्रतिजैविक घेणे टाळणे महत्त्वाचे आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT