IND vs AUS CT 2025 Record List: कांगारूंचा माज मोडला, रोहित-विराटची हवा.. टीम इंडियाने मोडले 'हे' रेकॉर्ड!
या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघानं अनेक विक्रम केले. यासोबतच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही अनेक विक्रम आपल्या नावावर केले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध केलेली ही कामगिरी ऐतिहासिक आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारताने कांगारूंचा माज मोडला

दुबईच्या मैदानात केले नवे रेकॉर्ड

रोहित, कोहलिची तुफान हवा
IND vs AUS CT 2025 : मंगळवारी (4 मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघानं 11 चेंडू बाकी असतानाच धावसंख्येचा पाठलाग केला.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : आरोपी फक्त 8 नाही, मुंडेंचा राजीनामा म्हणजे शेवट नाही? घडामोडींचा अर्थ काय?
गोलंदाजीत मोहम्मद शमीने 3, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी 2-2 आणि हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारतीय संघ जेव्हा बॅटींगसाठी मैदानात उतरला, तेव्हा विराट कोहलीने 84 धावा करून चेज मास्टर का म्हटले जातं हे दाखवून दिलं. कोहली व्यतिरिक्त, श्रेयस अय्यर (45) आणि केएल राहुल (नाबाद 42) यांनीही तुफान बॅटींग केली. त्याच वेळी, हार्दिक पांड्याने 28 धावांची छोटी खेळी करत आपली छाप पाडली. तसंच या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघानं अनेक विक्रम केले. यासोबतच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही अनेक विक्रम आपल्या नावावर केले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध केलेली ही कामगिरी ऐतिहासिक आहे. कारण, रोहित शर्मा आयसीसीच्या चारही स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला कर्णधार बनला आहे.
रोहितची कामगिरी
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2023)
एकदिवसीय विश्वचषक (2023)
टी२० विश्वचषक (2024)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2025)
एकाच मैदानात सर्वाधिक सामने जिंकले
10 - न्यूझीलंड, ड्युनेडिन
09 - भारत, दुबई (11 सामने, 1 अनिर्णित)
7 - भारत, इंदूर
7 – पाकिस्तान, हैदराबाद (नियाज स्टेडियम, पाकिस्तान)
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नॉकआउट
44 धावांनी विजयी, ढाका, 1998 उपांत्यपूर्व फेरी
20 धावांनी विजयी, नैरोबी, 2000 उपांत्यपूर्व फेरी
04 विकेट्सनी विजयी, दुबई, 2025 उपांत्य फेरी
हे ही वाचा >>Jalna Crime : जाळावर सळई तापवून दिले चटके, जुन्या वादातून केला छळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
चॅम्पियन्स ट्रॉफी नॉकआउटमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग
282 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, ढाका, 1998 क्वार्टर फायनल
265 - न्यूझीलंड विरुद्ध भारत, नैरोबी, 200 अंतिम सामना
265 - भारत विरुद्ध बांगलादेश, एजबॅस्टन, 2017 उपांत्य फेरी
265 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई, 2025 उपांत्य फेरी
ICC ODI स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार
10 – सचिन तेंडुलकर
08 - ग्लेन मॅकग्रा
08 – रोहित शर्मा
07– विराट कोहली
कोहलीला चेस मास्टर का म्हटले जातंय?
विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 746 धावा केल्या आहेत. कोहलीने आता IIC स्पर्धेत 24 वेळा 50+ धावा केल्या आहेत. या सर्वाधिक धावा आहेत. कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 50+ धावा करण्याची ही सातवी वेळ आहे. इतर कोणत्याही खेळाडूने केलेल्या धावसंख्यांपैकी ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नावावर आता एकूण 336 झेल असून, या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडुंने घेतलेल्या सर्वाधिक झेल आहेत. मंगळवारी कोहलीला त्याच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, जो ICC स्पर्धेत 15 व्या वेळी होता. एकाच खेळाडूनं जिंकलेल्या वेळेची ही सर्वाधिक संख्या आहे.