IND vs PAK CT 2025: भारत-पाकिस्तान संघात कुणाची ताकद जास्त, कोण पडणार भारी? काय आहेत एक्स फॅक्टर?
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दोन्ही संघांच्या प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास, भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केलाय. तर दुसरीकडे, पाकिस्तानला न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव पत्करावा लागला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बांगलादेशविरुद्धच्या भारतीय संघाच्या सलामीच्या सामन्यात शुभमन गिल हिरो

अक्षर पटेल हा टीम इंडियाचा एक्स फॅक्टर?

नसीम शाह आणि हरिस रौफ यांची गोलंदाजी टीम इंडियाचा ताप वाढवणार?
India vs Pakistan CT 2025 Pre Match Analysis: भारत आणि पाकिस्तान संघ यापूर्वी शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2017 मध्ये खेळले होते. तेव्हा भारतीय संघ 110 धावांनी पराभूत झाला होता. 2013 मध्ये भारतीय संघ या स्पर्धेचा विजेता होता, तर 2002 मध्ये संयुक्त विजेता होता. 2017 मध्ये पाकिस्तानने या स्पर्धेत बाजी मारली होती.
हे ही वाचा >> Nashik : आधी चुकीच्या दिशेना आलेला ट्रक, नंतर ब्रेक फेल झालेला ट्रक... दोन अपघातात 4 जण ठार, 7 गंभीर
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दोन्ही संघांच्या प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास, भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केलाय. तर दुसरीकडे, पाकिस्तानला न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. गौतम गंभीर भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत तर आकिब जावेद पाकिस्तानचे प्रशिक्षक आहेत. पाकिस्तानी संघाचा मुदस्सर नजरही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाला विशेष इनपुट देताना दिसतोय.
भारतीय संघाची ताकद आणि एक्स फॅक्टर
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्धच्या भारतीय संघाच्या सलामीच्या सामन्यात शुभमन गिल हिरो ठरला होता. 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माने 41 धावा केल्या. एक कॅच सोडल्यानंतर केएल राहुलने 41 धावांची शानदार खेळी केली. मोहम्मद शमीने 5, हर्षित राणाने 3 आणि अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या. हार्दिक सध्या त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतही उत्तम कामगिरी करताना दिसतोय. तर अक्षर पटेल हा टीम इंडियाचा एक्स फॅक्टर आहे. त्याची गोलंदाजी फार कमालीची नसली, तरी त्याचा फलंदाजीचा स्ट्राईक रेट 139 आहे.
पाकिस्तानी संघाची ताकद आणि एक्स फॅक्टर
हे ही वाचा >> iPhone 16e : भारतात तयार झालेला iPhone 16e आता जगभरात विकला जाणार, किंमत किती? फिचर्स कोणते?
गेल्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार अपयशी ठरला असेल, पण त्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे. मधल्या फळीतील फलंदाज सलमान आगासुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याच वेळी, जर शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांची गोलंदाजी चांगली झाली, तर ती भारतीय संघासाठी धोक्याची घंटा असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खुशदिल शाह (69) आणि सलमान आगा (42) यांनी चांगली फलंदाजी केली होती. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू एक्स फॅक्टर असतील.