Jio Cricket Offer : नो टेन्शन! खिसा रिकामा झालाय? जिओ हॉटस्टारवर फ्री मध्ये पाहा IPL, 'हा' आहे जबरदस्त प्लॅन!
Jio Cricket Offer : नोट टेन्शन! खिसा रिकामा झालाय? जिओ हॉटस्टारवर फ्री मध्ये पाहा IPL, हा आहे जबरदस्त प्लॅन आगामी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने नवीन प्लॅन लॉन्च केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

काय आहे जिओ अनलिमिटेड ऑफर?

आयपीएलसाठी जिओने ग्राहकांना दिलीय जबरदस्त ऑफर

जिओच्या मोफत ऑफरबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
Jio Cricket Offer : नोट टेन्शन! खिसा रिकामा झालाय? जिओ हॉटस्टारवर फ्री मध्ये पाहा IPL, हा आहे जबरदस्त प्लॅन
आगामी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. हा नवीन एक्सक्लूझिव्ह प्लॅन कंपनीच्या जुन्या आणि सिम खरेदी करणाऱ्या नव्या ग्राहकांसाठी असणार आहे. जिओ सिमकार्ड आणि 299 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे प्लॅन वापरणारे ग्राहक येणाऱ्या काळात सर्व क्रिकेट सामने मोफत पाहू शकतील. 299 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांच्या प्लॅनचा नवीन जिओ सिम कनेक्शन घेण्यासाठी किंवा 299 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर जिओ ग्राहक, जिओहॉटस्टार (jioHotstar) वर मोफत आयपीएल क्रिकेटचे सामने पाहू शकता.
काय आहे जिओ अनलिमिटेड ऑफर?
या अनलिमिटेड क्रिकेट ऑफरमध्ये ग्राहकांना ग्राहकांना टीव्ही/मोबाईलवर 90 दिवसांचं मोफत जिओ हॉटस्टार सब्स्क्रिप्शन मिळेल. तसच यामध्ये 4K क्वालिटीचे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहेत. 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यापासून 90 दिवसांपर्यंत ही ऑफर व्हॅलिड असणार आहे.
हे ही वाचा >> Aurangzeb Tomb : "औरंगजेबाची कबर उखडा", विहिंपचा इशारा; 'कारसेवा करणार' म्हणजे नेमकं काय?
याचसोबत जिओ ग्राहकांसाठी जिओफायबर किंवा जिओएअरफायबरचं मोफत ट्रायल कनेक्शनही मिळणार आहे. अल्ट्रा-फास्ट इंटरनेटचा मोफत ट्रायल कनेक्शन 50 दिवसांपर्यंत फ्री राहणार आहे. ग्राहकांना 4K क्वालिटीचे व्हिडीओ पाहण्याचा अनुभव तर मिळणारच आहे, याचसोबत ग्राहक होम एन्टरटेनमेंटचा लाभही घेऊ शकतात. जिओफायबर किंवा जिओ एअरफायबरच्या मोफत ट्रायल कनेक्शनसोबत 800+TV चॅनेल्स, 11+OTT अॅप, अनलिमिटेड WIFI ची सुविधाही मिळणार आहे.

हे ही वाचा >> Astro: तुमचा जन्म महिना सांगेल तुमच्याबाबतचं 'हे' रहस्य, तुम्हालाही नसेल माहीत 'ही' गोष्ट
या ऑफरचा लाभ 17 मार्चपासून 31 मार्च 2025 पर्यंत घेतला जाऊ शकतो. ऑफरचा लाभ घेण्यासाठी जिओ सिम यूजर्सला कमीत कमी 299 रुपयांचा रिजार्ज करावा लागणार आहे. तसच नव्या जिओ सिम ग्राहकांनाही 299 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्लॅनवाला नवीन जिओ सिम घ्यावा लागणार आहे. ज्या ग्राहकांनी 17 मार्चच्या आधी रिचार्ज केला आहे, ते सुद्धा 100 रुपयांचं एड-ऑन पॅकेज घेऊन ऑफरचा लाभ घेऊ शकतात.