Jitendra Awhad : "दोन-तीन महिने जे झालं ते...", धस-मुंडेंच्या भेटीनंतर काय म्हणाले आव्हाड?
"धनंजय मुंडे, सुरेश धस आणि आम्ही चार-साडेचार तास होतो. धनंजय मुंडे-सुरेश धस या दोघांमध्येही मतभेद आह, मनभेद नाही. दोघंही फार इमोशनल आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, आमचे जुने संबंध आहे. सुरेश धस, धनंजय मुंडेंची पारिवारिक भेट झाली असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा?

सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर काय म्हणाले आव्हाड?
Jitendra Awhad Vs Suresh Dhas : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरुन आता राजकारण पेटलेलं असताना आता जितेंद्र आव्हाड यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीस नेण हा स्वभाव गुण असतो आणि मध्येच सोडून देणार हा दुर्गुण असतो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. "मानवी स्वभाव जो असतो त्याचा अभ्यास करावा लागेल, डिसेंबर पासून धस हे धनंजय मुंडेंवरती तोफा डागत होते आणि अचानक म्हणतात मी राजीनामाच मागितला नाही" असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
हे ही वाचा >> Manoj Jarange: सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीनंतर मनोज जरांगे संतापले! म्हणाले, "समाजाच्या बांधवाचा खून केलाय, तुम्ही त्याला..."
आम्ही चुकीचं ऐकलं असेल, पण हे प्रकरण उघड कस झालं? तर बावनकुळे यांनी सांगितलं की हे दोघे भेटले आणि मी होतो,साडेचार तास भेटले. साडेचार तास हे का भेटले असतील याचे उत्तर कोणाकडे आहे का? सध्या त्यांच्या वागण्यात फरक दिसतोय. धस सध्या अतिशय क्षमाक्षील झालेत, संत झालेत, संत परंपरेवर चाललेत असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्राने दोन-तीन महिने जे बघितलं ते आता विसरून जायचं, जणू आमच्यात काय झालं नाही असं बोलायला हे मोकळे झाले असंही आव्हाड म्हणाले आहे.
दरम्यान, "धनंजय मुंडे, सुरेश धस आणि आम्ही चार-साडेचार तास होतो. धनंजय मुंडे-सुरेश धस या दोघांमध्येही मतभेद आह, मनभेद नाही. दोघंही फार इमोशनल आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, आमचे जुने संबंध आहे. सुरेश धस, धनंजय मुंडेंची पारिवारिक भेट झाली असं बावनकुळे म्हणाले. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ सुरू झाली आहे. या भेटीमागे खरंच प्रकृतीची चौकशी करण्याचं कारण होतं की इतर राजकीय चर्चा झाल्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी वेगवेगळ्या मोर्चांमध्ये जोरदार भाषणं करत आपली आक्रमक भूमिका मांडली होती. मात्र, आता या भेटीनंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवरही संशय घेतला जातोय.