Kailas Phad : बीड पोलिसांना उशिरा जाग? शरद पवारांच्या नेत्याला मारहाण करणाऱ्या कैलास फडवर...

मुंबई तक

पोलीस बॉडीगार्डचा जबाब नोंदवण्यात आला असून, तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. दरम्यान याच अनुषंगाने मारहाण करणारा कैलास फड याच्यासह इतर साथीदारावर गुन्हा नोंदविला जाणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजेसाहेब देशमुख यांच्या तक्रारीची 3 महिन्यांनी दखल

point

पोलिसांना उशिरा जाग? नोंदवला जबाब

point

कैलास फड, निखिल फडविरोधात गुन्हा दाखल होणार

Kailas Phas Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये पोलिसांसमोर कायदा व सुव्यस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांनीही कारवाई करण्यास सुरूवात केली असून, अनेक निर्णय घेतले जात आहेत. पोलिसांनी अनेक जुन्या फाईलवरची धूळ झटकल्याचं दिसतंय. त्यातच आता विधानसभा निवडणूक मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण प्रकरणी पोलीस गार्डचा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे आता पोलीस चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय.

हे ही वाचा >> Samay Raina च्या मदतीला धावली भारती? म्हणाली, त्याचा शो तसाच आहे, पण तो मुलगा...

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी मतदानाच्या दिवशीच राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पोलीस बॉडीगार्डचा जबाब नोंदवण्यात आला असून, तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. दरम्यान याच अनुषंगाने मारहाण करणारा कैलास फड याच्यासह इतर साथीदारावर गुन्हा नोंदविला जाणार आहे. पोलीस गार्ड मोहन रामा दांडगे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला, त्याचबरोबर धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्यामुळे कलम 132,189(2),191(2),115 (2) 352 351(3) प्रमाणे  कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड व इतर चार जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा नोंदविण्यास एवढा विलंब का लावला?

हे ही वाचा >> Akola : अकोल्यात उर्दू शाळांमध्ये धक्कादायक प्रकार! "संचालकच घेतो अर्धे पगार, न दिल्यास लैंगिक छळ"

विधानसभा निवडणुकीत घडलेल्या या प्रकाराचा गुन्हा एवढा उशिरा कसा नोंद केला जातोय असाही एक प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान, आरोपी कैलास फड याच्यावर महिनाभरापूर्वी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा झाला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. तसंच त्यांचे शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp