Maharashtra Weather Update : 27 आणि 28 डिसेंबरला विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीसह पावसाची शक्यता, वाचा तुमच्या जिल्ह्याची अपडेट
राज्यात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांवर परिणाम होईल. या भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात बहुतांश भागात पावसाची शक्यता

27 आणि 28 डिसेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज

तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का? वाचा सविस्तर
Maharashtra Rain Updates : हवामान विभागाने 27 डिसेंबरच्या दुपारपासून नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर सारख्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्याचा दक्षिणेकडेचा आणि पुण्याच्या पूर्वेकडील भागत तसंच नाशिक जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
27 डिसेंबरला रात्री हे वारे पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागांकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांवर परिणाम होईल. या भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाचा ED ला मोठा दणका! लॅपटॉप, मोबाईल जप्त करुन डेटा...
28 डिसेंबरच्या पहाटेपासून, वादळी वारे पूर्वेकडे सरकतील. त्यामुळे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांना फटका बसेल. या भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
हवामान विभागाने ढगाळ वातावरणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर राहील अशी शक्यता आहे.
हे ही वाचा >> भाजप आमदाराच्या मामीनेच काढला मामाचा काटा, 'या' कारणामुळे संपवलं पतीला!
29 डिसेंबरपर्यंत, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणं वगळता राज्यातील बहुतेक भागात स्थिर हवामान राहील. तर 30 डिसेंबरपासून तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज आहे.