Manoj Jarange : "वारकरी संप्रदाय काय गुंड चालवतात का?" नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सवाल
मी महंतांवर बोलू शकत नाही, ते कुणाला भीत नाहीत, पण त्यांना कुणी एकच बाजू सांगितली असेल, तर ते बोललेही असतील असं मनोज जरांगे म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महंत नामदेव शास्त्री यांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा

धनंजय मुंडेंवर मीडिया ट्रायल : महंत नामदेव शास्त्री

"वारकरी संप्रदायाचं नुकसान होतंय"

महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर जरांगे म्हणाले...
"महतं नामदेव शास्त्री असं बोलू शकत नाहीत, त्यांना कुणीतरी सांगितलेलं असू शकतं" असं म्हणत मनोज जरांगे यांनी नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. आज सकाळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. तसंच महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवर आपलं विश्वास बसत नाही असं मनोज जरांगे म्हणाले. संभाजीनगरमध्ये रुग्णालयात भरती असलेल्या मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हे ही वाचा >>Namdeo Shastri : धनंजय मुंडे यांच्यावर मीडिया ट्रायल, भगवानगड त्यांच्या पाठीशी : महंत नामदेव शास्त्री
मी महंतांवर बोलू शकत नाही, ते कुणाला भीत नाहीत, पण त्यांना कुणी एकच बाजू सांगितली असेल, तर ते बोललेही असतील असं मनोज जरांगे म्हणाले. एक संस्कारी पिढी घडवणारे, समाज घडवणारे ते नामदेव शास्त्री आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवलं असेल असं मनोज जरांगे म्हणाले. खून, चोरी, छेडछाडी करणाऱ्यांबद्दल ते असं बोलतील असं वाटत नाही. त्यांना दोष देता येणार नाही, कारण जो गेलाय, त्याला कुठंकुठं हात पसरावे हेच कळेना. मरण पुढे दिसल्यानंतर असंच होतं.
समाज कुठलाही असो, एवढी विकृत घटना पाठीशी कुणीही घालणार नाही. फक्त धनंजय मुंडेंची टोळी सोडली तर इतर कुणी समर्थन करणार नाही. वंजारी समाजाला या गोष्टी मान्य नाही. अशा लोकांना समाज पाठीशी घालणार नाही, महंत सुद्धा त्यांना पाठीशी घालणार नाही.
हे ही वाचा >> Abhishek Verma : व्यावसायिक अभिषेक वर्मा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत; हेलिकॉप्टर घोटाळ्यात...
वारकरी संप्रदाय बदनाम होतोय असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, गुंड थोडी वारकरी संप्रदाय चालवतात. गुंडाचे सहारे घेऊन वारकरी संप्रदाय थोडी चालतो असं जरांगे म्हणाले. मला शंका येतेय, की जे गेलेत त्यांनीच शिकवलं. कारण नामदेव शास्त्री हे असं बोलतील यावर विश्वास नाही. आरोपींनाही मारहाण झाली होती, त्यांची मानसिकता का तयार झाली हे समजून घ्यायला पाहिजे असं नामदेव शास्त्री म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले असं म्हणणं म्हणजे आरोपींना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देणं आहे असं जरांगे म्हणाले.