Nashik : आधी चुकीच्या दिशेना आलेला ट्रक, नंतर ब्रेक फेल झालेला ट्रक... दोन अपघातात 4 जण ठार, 7 गंभीर

मुंबई तक

Mumbai Agra Highway Accidents : शुक्रवारी रात्री उशिरा चांदवड येथील राहुड घाटाजवळ एक अपघात झाला. उतारावर ब्रेक फेल झाल्यामुळे एका वेगानं येणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं पुढे जाणाऱ्या 7 ते 8 वाहनांना धडक दिली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिकमध्ये ट्रकचे दोन भीषण अपघात

point

एका अपघातात ब्रेक फेल, दुसऱ्यात चालकाचा निष्काळजीपणा

point

दोन अपघातांमध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर एकूण सात जण गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अपघात शनिवार आणि शुक्रवारी रात्री घडले, त्यापैकी एका अपघात ट्रक वेगानं आणि चुकीच्या दिशेनं चालवत आल्यानं अपघात झाला. तर दुसरा अपघात ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे झाला.

हे ही वाचा >> "गुंडगिरी दहशत संपवण्यासाठीच मी राजकारणात...", काळे झेंडे दाखवल्यानंतर सुरेश धस यांनी मुंडे समर्थकांना दिला इशारा

शनिवारी सकाळी 11 वाजता मालेगाव तालुक्यातील डेरेगाव गावाजवळ पहिला अपघात झाला. एक कंटेनर ट्रक चुकीच्या दिशेनं वेगानं येत होता. अचानक ट्रक नियंत्रणाबाहेर गेला, उलटला आणि समोरून येणाऱ्या ऑटोरिक्षाला चिरडला. या अपघातात ऑटो चालक आणि दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकचा भीषण अपघात 

दुसरीकडे शुक्रवारी रात्री उशिरा चांदवड येथील राहुड घाटाजवळ एक अपघात झाला. उतारावर ब्रेक फेल झाल्यामुळे एका वेगानं येणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं पुढे जाणाऱ्या 7 ते 8 वाहनांना धडक दिली. या अपघातात एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. इतर काही लोकांनाही किरकोळ दुखापत झाली.

हे ही वाचा >> Nagpur : शेताकडे जात असताना वाघाचा हल्ला, मानेला धरून फरफटत नेलं, शेतकऱ्याचा करूण अंत

पोलिसांनी दोन्ही अपघातांबाबत गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा तपास सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या अपघातात चुकीच्या दिशेने येणारा ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटला, तर दुसऱ्या अपघातात ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि तो अनेक वाहनांना धडकला. दोन्ही घटनांमध्ये जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ट्रक चालकांची जबाबदारी निश्चित केली जाईल आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp