New India Cooperative Bank च्या सीईओला पोलिसांकडून अटक, 122 कोटींच्या घोटाळ्यात हात?

मुंबई तक

प्रभादेवीमध्ये असलेल्या बँकेच्या मुख्य शाखेतून रोख रक्कम गायब करण्यात भोअनची भूमिका संशयास्पद असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेत घोटाळो

point

हजारो लोकांचे कोट्यवधी अडकले

point

पोलिसांकडून आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना अटक

New India Cooperative Bank Scam : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी माजी सीईओ अभिमन्यू भोअन (45) यांला अटक केली आहे. भोअन 2008 पासून बँकेशी संबंधीत काम करत असून, 2019 ते 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत तो मुख्य कार्यकारी अधिकारी होता.

हे ही वाचा >> Raj Thackeray: "...म्हणून मुंबई महानगरपालिकेवर खूप ताण", आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

बँकेने 6 फेब्रुवारी 2025 ला आरबीआयला कळवलं की, भोअनला बँकेच्या सीईओ पदावरून मुक्त करण्यात आलं आहे. तेव्हापासून तो रजेवर होता. जेव्हा आरबीआयचं ऑडिट झालं, तेव्हा तो बँकेत नव्हता. 18 फेब्रुवारी रोजी त्याची चौकशी करण्यात आली. 20 फेब्रुवारी रोजी त्याची पुन्हा चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर रात्री 11 वाजता त्याला अटक करण्यात आली. त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं आर्थिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. याच प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौण यांच्या कोठडीतही 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

अभिमन्यू भोअनचा फसवणुकीत हात?

प्रभादेवीमध्ये असलेल्या बँकेच्या मुख्य शाखेतून रोख रक्कम गायब करण्यात भोअनची भूमिका संशयास्पद असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच तो या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जनरल मॅनेजर हितेश मेहता याचा सुपरवायझर अधिकारी होता. बँकेच्या तिजोरीतून रोख रकमेच्या चोरीत अभिमन्यू भोअनची भूमिका तपासली जाईल, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एवढी मोठी रोकड येत होती आणि गायब होत होती, मग हे कसं घडलं? दरम्यान, बँकेचे ऑडिटर अभिजीत देशमुख यांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे असंही तपास अधिकाऱ्यांकडून कळलं आहे.

बँकेच्या तिजोरीतून रोख रक्कम कशी गायब झाली?

2019 पासून वेगवेगळ्या वेळी 50 लाख ते 1.5 कोटी रुपयांची रोकड चोरीला जात असल्याचा संशय तपासकर्त्यांना आहे. काही प्रसंगी हितेश मेहता स्वतः तिजोरीतून पैसे काढत असे आणि काही प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांना तिजोरीतून पैसे आणण्यास सांगत असत. 2019 पासून बँकेच्या बॅलन्स शीटच्या ऑडिट दरम्यान, दरवर्षी गहाळ झालेल्या रोख रकमेची थकबाकी वाढतच गेली.

हे ही वाचा >> Raj Thackeray: "...म्हणून मुंबई महानगरपालिकेवर खूप ताण", आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

बँक अधिकाऱ्यांच्या मते, 2017 मध्ये बँकेच्या मुख्य शाखेत रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा 20 कोटी रुपये होती. तेव्हापासून ही मर्यादा वाढवण्यात आली नाही, पण रोख रक्कम वाढतच राहिली. अखेर, तिजोरीत 133 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं, पण नियमांनुसार, बँकेच्या तिजोरीत इतकी रोकड का आणि कोणाच्या आदेशाने ठेवण्यात आली याचं उत्तर बँक अधिकाऱ्यांना द्यावं लागणार आहे. या प्रकरणातील आणखी एक वॉन्टेड आरोपी, उन्नाथन अरुणचलम उर्फ ​​अरुण भाई, अजूनही फरार आहे. हितेश मेहता यांनी चौकशीदरम्यान कबूल केलं आहे की, त्यांनी बँकेतून चोरीला गेलेल्या रोख रकमेतून अरुणला 40 कोटी रुपये दिले होते.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp