Nitesh Rane : "आम्ही EVM मुळेच निवडून आलो, पण ईव्हीएम म्हणजे Every Vote Against Mulla"

मुंबई तक

नितेश राणे सांगलीमध्ये बोलताना असंही म्हणाले की, मी हिंदुत्वाच्या आधारावर निवडून आलो आहे. मी दुसरीकडे गेलोच नाही. मला काही फरक पडला नाही. मला हिंदूनीच मतदान केलं, मी आमदार म्हणून निवडून आलो आणि मंत्री झालो असं राणे म्हणाले

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नितेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

point

'एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला' हा ईव्हीएमचा अर्थ

point

सांगलीमध्ये बोलताना नितेश राणे यांचं वक्तव्य

Nilesh Rane Sangli : मंत्री नितेश राणे हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आज ते सांगलीमध्ये बोलताना असताना पुन्हा एकदा त्यांनी असंच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिंदू म्हणून आपली भूमिका स्पष्ट ठेवली आणि हिंदूंनी एकत्र येऊन मतदान केलं, म्हणून आता हे EVM च्या नावाने बोंबलत आहेत असं नितेश राणे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा >> Nanded : मोबाईल मिळाला नाही म्हणून मुलाचा झाडाला गळफास, खचलेल्या बापानं त्याच दोरीने... नांदेड हादरलं

"EVM च्या नावाने विरोधक बोंबलत आहेत, कारण त्यांना हजम होत नाहीये की, हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करतो. विरोधकांना वाटत होतं, की हिंदू समाज मतदान करायला एकत्र येऊ शकत नाही. हे EVM ला दोष देतात, पण या लोकांना EVM चा अर्थ माहितीच नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं हे विरोधकांना कळलंच नाही. EVM चा अर्थ आहे Every Vote Against Mulla. असं" नितेश राणे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, आम्ही EVM मुळेच निवडून आलोय, हे तीन-तीन आमदार बसलेत असं नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा >> S. N. Subrahmanyam : "90 तास काम करा, बायकोकडे किती बघत बसणार...", L & T चे सर्वेसर्वा सुब्रमण्यम यांचं वक्तव्य

नितेश राणे पुढे असंही म्हणाले की, मी हिंदुत्वाच्या आधारावर निवडून आलो आहे. मी दुसरीकडे गेलोच नाही. मला काही फरक पडला नाही. मला हिंदूनीच मतदान केलं, मी आमदार म्हणून निवडून आलो आणि मंत्री झालो असं राणे म्हणाले

नितेश राणे यांनी यापूर्वीही अनेकदा मुस्लिम धर्मीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता पुन्हा त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मंत्री असलेल्या नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp