Viral Video : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा! पोलिसांनी केला लाठीचार्ज; तरुणांनी केलं असं काही...
Guatami Patil Dance Viral Video : सबसे कातील गौतमी पाटील म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रीय झालेल्या या अभिनेत्रीच्या जालना येथील डान्स शोमध्ये राडा झाला. दहीहंडी उत्सवानिमित्त जालन्यात गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमात तरुणांनी केली हुल्लडबाजी
सबसे कातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चाहते थेट चढले शेडवर
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
Guatami Patil Dance Viral Video : सबसे कातील गौतमी पाटील म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रीय झालेल्या या अभिनेत्रीच्या जालना येथील डान्स शोमध्ये राडा झाला. दहीहंडी उत्सवानिमित्त जालन्यात गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. गौतमीच्या चाहत्यांनी मैदान भरगच्च भरल्याने काही तरुणांनी शेडवर चढून ठेका धरला. परंतु, तरुणांनी शो दरम्यान हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
ADVERTISEMENT
गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमातील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या गर्दीने मैदान हाऊसफुल्ल झाले होते. दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लावणीच्या शो दरम्यान काही तरुण कायद्या सुव्यस्था बिघडवण्याचं काम करत होते. त्यामुळे पोलिसांनी या तरुणांवर लाठीचार्ज करून जमावाला नियंत्रित ठेवण्याचं काम केलं.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : तुमचा अर्ज DRAFT मध्ये अडकलाय...वेबसाईटवर कसा करायचा सबमिट?
इथे पाहा गौतमी पाटीलच्या डान्सचा व्हायरल व्हिडीओ
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
गौतमी पाटीलला चढावी लागली होती कोर्टाची पायरी
अहमदनगरमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. याच कार्यक्रमामुळे गौतमी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गौतमी पाटीलला अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागणार होतं. त्यानुसार गौतमी कोर्टात हजर झाली. यावेळी न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.
हे ही वाचा >> Badlapur: 'तो एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखा...', अक्षय शिंदेंच्या पहिल्या पत्नीनं सांगितलं भीषण सत्य
गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांनी विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचं उल्लंघन केलं होतं. या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही केस कोर्टात पोहोचल्यानंतर गौतमीला अटी आणि शर्तींनुसार जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे गौतमीला मोठा दिलासा मिळाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT