RBI : काय सांगता! सोन्याचे भाव वाढणार? आरबीआयने खरेदी केलं सर्वात जास्त सोनं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Gold Rates Update, RBI Bank
Gold Rates Update, RBI Bank
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरबीआयने सर्वात जास्त सोनं खरेदी का केलं?

point

आरबीआयच्या सोने खरेदीमुळं सोन्याचे भाव वाढणार का?

point

या बँकांनी पहिल्या सहा महिन्यात खरेदी केलं 483 टन सोनंं

Reserve Bank Of India Gold : जगभरात सुर असलेल्या भू-राजकीय तणावामुळं अनेक केंद्रीय बँकांनी सोनं खरेदी करण्यात वाढ केली आहे. आताची परिस्थिती पाहता सर्व देशांच्या केंद्रीय बँकांनी त्यांच्या तिजोरीत सोन्याचं प्रमाण वाढवण्यासाठी एकप्रकारे शर्यतच सुरु केली आहे. एप्रिल-जून 2024 मध्ये आरबीआय संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे. या बँकांनी यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात 483 टन सोनं खरेदी करून मोठा किर्तीमान मिळवला आहे. जानेवारी ते जून दरम्यान या बँकांनी 2023 च्या पहिल्या सहा महिन्यातील 460 टन सोन्याच्या तुलनेत 5 टक्के जास्त गोल्ड खरेदी केलं आहे.

ADVERTISEMENT

RBI ने खरेदी केलं सर्वात जास्त गोल्ड

यावर्षीच्या पहिल्या तिमाहीबद्दल बोलायचं झालं, तर 2024 ची दुसरी तिमाही म्हणजेच एप्रिल-जूनमध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी 183 टन सोने खरेदी केलं. जे एप्रिल-जूनच्या तुलनेत 6 टक्के जास्त आहेत. दरम्यान, हा आकडा यावर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कमी आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत केंद्रीय बँकांनी 300 टन सोने खरेदी केलं होतं. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सर्वात जास्त सोनं खरेदी करण्यात कोणत्या देशांच्या केंद्रीय बँका अव्वल स्थानी होत्या? उपलब्ध माहितीनुसार, नॅशनल बँक ऑफ पोलँड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर राहिल्या आहेत.

हे ही वाचा >> Baramati News : लाडक्या बहिणी साड्या न घेताच निघून गेल्या! युगेंद्र पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, काय घडलं?

या बँकांनी 19-19 टन सोनं खरेदी केलं आहे. तुर्कीच्या सेंट्रल बँकेने 15 टन गोल्ड खरेदी करून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 45 टन सोनं खरेदी केलं आहे. जॉर्डन, कतार, रशिया, उजबेकिस्तान, किर्गीजस्तान आणि चेक रिपब्लिकच्या केंद्रीय बँकांनीही दुसऱ्या तिमाहीत खूप सोनं खरेदी केलं आहे. तर चीनच्या सेंट्रल बँकेने कमी सोनं खरेदी केलं आहे.

हे वाचलं का?

सोनं खरेदीचा काय झाला परिणाम?

सेंट्रल बँकांनी केलेल्या या मोठ्या खरेदीमुळं सोन्याच्या बाजारात याचा मोठा परिणाम दिसू लागला आहे. अमेरिकी करन्सी म्हणजेच डॉलरमध्ये उलाढाल होत असल्याने सोन्याच्या बाजाराची स्थिती बदलत आहे. महागड्या गोल्ड ज्वेवरीच्या मागणीचाही यात समावेश आहे. सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केल्यानं या वर्षी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तसच गोल्ड मायनिंग कंपन्यांचं उत्पादनामुळेही सोन्याच्या किंमतीवर प्रभाव पडला आहे. सोन्याचं उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा आणि अमेरिकेचा समावेश आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, पैशांचं टेन्शनच घेऊ नका! सरकारने दिली आणखी एक संधी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT