Sanjay Raut : "आमच्याकडे आल्या, 4 वेळा आमदार झाल्या, जाताना घाण करून गेल्या; ही विश्वासघातकी, नीर्लज्ज, बाई..."
दिल्लीत सुरू असलेल्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळतं असं म्हटलं होतं. त्यावर राऊत यांनी ही आगपाखड केली. तसंच ही टीका नीलम गोऱ्हे यांच्यावर केली असून, त्यामुळे आपल्या असले 10 हक्कभंग केले तरी घाबरत नाही असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संजय राऊत यांची नीलम गोऱ्हे यांच्यावर आगपाखड

संमेलनातील राजकीय चिखलफेकीसाठी शरद पवारही जबाबदार

उद्धव ठाकरेंवरील आरोपानंतर संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut Vs Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांना नीर्लज्ज बाई म्हणत आगपाखड केली आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी साहित्य संमेलन भरवलंत का? असा सवालही राऊतांनी केलं. मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ही कोण बाई आणली तुम्ही पक्षात. आपल्याला आयुष्यभर त्यांनी शिव्या घातल्या होत्या असंही बाळासाहेब म्हणाले होते. काही लोकांच्या मर्जीखातर आमच्याकडे आल्या, चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटात घाण करून गेल्या असं राऊत म्हणाले.
हे ही वाचा >>Ajit Pawar : "मला हलक्यात घेऊ नका..." या शिंदेंच्या वक्तव्यावर दादांची प्रतिक्रिया, एकच हशा पिकला
नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या साहित्य संमेलनात बोलताना उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळतं असं म्हटलं होतं. त्यावर राऊत यांनी ही आगपाखड केली. तसंच ही टीका नीलम गोऱ्हे यांच्यावर केली असून, त्यामुळे आपल्या असले 10 हक्कभंग केले तरी घाबरत नाही असं राऊत म्हणाले.
"लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात?"
"नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं की, मी महामंडळाला 50 लाख रुपये दिले आणि माझा कार्यक्रम लावला. जर मी मर्जिडीज देऊ शकते, तर 50 लाखही देऊ शकते" असं त्या म्हणाल्याचा दावा संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो हे सांगायला आम्हालाही बोलवायचं होतं. ही कोण बाई आहे? ही बाईमाणूस आहे. हे कुठलं भूत आहे? जे साहित्य संमेलनाच्या मंचावरुन गरळ ओकतेय. मराठी साहित्य आणि मराठी माणसाचं नुकसान या लोकांमुळे होतंय. साहित्य महामंडळ हे भ्रष्ट झालंय, त्यांनी पैसे घेऊन, भेटी घेऊन हा कार्यक्रम लावलाय. त्यांनी लगेचच त्यांनी या वक्तव्याचा निषेध करायला हवा होता असं राऊत म्हणाले.
"शरद पवार तेवढेच जबाबदार"
हे ही वाचा >>Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक घेणार जनता दरबादर, शिवसेना भाजपमधील धुसफूस वाढणार?
"शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, ते जबाबदारी झिडकारू शकत नाही. ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, त्यामुळे ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि राजकीय चिखलफेक झाली, त्यासाठी ते सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे ते सुद्धा जबाबदार आहेत. संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनीही निषेध व्यक्त केला पाहिजे." असं संजय राऊत म्हणाले आहेत.