Santosh Deshmukh Case : "संतोष देशमुख हत्याकांड अवैध संबंधांतून घडलंय असं दाखवण्याचा प्लॅन होता"

मुंबई तक

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह केजकडे नेण्याऐवजी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न होता. त्यांना कळंबला एका महिलेच्या घरी नेऊन हा मृतदेह टाकायचा होता असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख प्रकरणात मोठा कट रचण्याचा प्रयत्न होता

point

गावकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्यासमोर केले गंभीर आरोप

point

प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होता

सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग गावचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट दिली. त्यानंतर उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी आणि मस्साजोगकरांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर अनेक धक्कादायक असे दावे केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनीच अनेक षडयंत्र केले असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे ही वाचा >> Mahayuti : एकनाथ शिंदेंच्या 20 आमदारांची Y सुरक्षा काढली, महायुतीमधील धुसफूस आणखी वाढणार?

बीड पोलिसांनीच सरपंच संतोष देशमुख हत्याकांड महिलेसोबतच्या अवैध संबंधांतून घडलंय असं दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी एक महिलाही तयार ठेवली होती. पण आमच्या तरुणांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग केल्यामुळे त्यांचा हा डाव फसला, हा खळबळजनक आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला आहे. या आरोपामुळे बीड जिल्हा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हे ही वाचा >> Supriya Sule : "संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुप्रिया सुळे लढणार, माझा शब्द"

गावकऱ्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबानेही आपल्या भावना सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडल्या. सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली.यावेळी जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, मेहबूब शेख, सक्षना सलगर हे सुद्धा तिथे उपस्थित होते.

संतोष देशमुखांच्या मुलीचे गंभीर आरोप

"सरपंच असल्यानं आवादा कंपनीच्या वादात वडिलांना बोलावलं. तेव्हा वडील गेले तर त्यांनाही मारलं. म्हणून गावातले लोक तिथे गेले आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी 9 तारखेला ही घटना केली. 6 तारखेपासून ते वडिलांवर पाळत ठेवून होते" असं संतोष देशमुख यांच्या मुलीने सांगितलं. पोलिसांनी लवकर तक्रार घेतली नाही, आम्हाला चुकीच्या दिशेला पाठवलं, पटकन जामीन होईल अशी कलमं पोलिसांनी दाखल केलीत असं गावकऱ्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp