जावयासोबत वाद, सासऱ्यानं झोपेत असतानाच डोक्यात कुऱ्हाड घातली, वादाचं कारण ऐकून...
Palghar News: पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री आरोपी त्याच्या जावयाच्या घरी गेला आणि तो गाढ झोपेत असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पालघरमध्ये सासऱ्याकडून जावयाची हत्या

झोपेत असतानाच डोक्यात कुऱ्हाड घातली

डोक्यात कुऱ्हाड घालून पळाला आरोपी
Palghar Crime News : राज्यात रोज एक हादरवून सोडणारी गुन्हेगारीची घटना घडतेय. अशीच एक घटना आज पालघरमध्ये घडली आहे. पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादानंतर 75 वर्षीय एका वृद्धानं थेट आपल्या जावयाचीच कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. त्यानंतर आरोपी पळून गेला अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
हे ही वाचा >> लातूर हादरलं! डोंगराच्या पायथ्याशी ड्रग्ज फॅक्ट्रीवर DRI चा छापा, आरोपींमध्ये पोलीस?
सोमवार रात्री वाडा परिसरात ही घटना घडली. 42 वर्षीय मृत व्यक्ती लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन देऊन पैसे घ्यायचा आणि फसवणूक करायचा आणि फसवणूक करायचा. या व्यक्तिने आपल्या सासऱ्यांकडूनही पैसे घेतले होते. यामुळेच त्यांच्यात वाद झाला होता.
सासरा आणि जावयामधले हे वाद वाढत गेले. त्यांच्या अनेकदा जोरदार भांडणंही झाले असं वाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी सांगितलं. दोन महिन्यांपूर्वी, अशाच एका भांडणात, आरोपीने त्याच्या जावयावर विळ्याने हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा >> Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री आरोपी त्याच्या जावयाच्या घरी गेला आणि तो गाढ झोपेत असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. पुढच्या काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलीस आरोपी सासऱ्याचा शोध घेत आहेत.
मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी मंगळवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. फरार असलेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. लवकरच अटक केली जाईल.