Air India च्या फ्लाईटमध्ये प्रवाशाने केलं सर्वात घाणेरडं कृत्य! फ्लाईट बँकॉकला पोहोचताच पँट उघडली अन्...
Air India Flight Viral News : एअर इंडियाची फ्लाईट AI 2336 मध्ये एका प्रवाशाच्या संतापजनक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली. एका प्रवाशाने बिजनेस क्लासमध्ये बसलेल्या अन्य एका प्रवाशावर लघवी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये घडली धक्कादायक घटना!

फ्लाईट दिल्लीहून बँकाकला पोहोचल्यावर ही घटना घडली

फ्लाईटच्या बिझनेस क्लासमध्ये नेमकं घडलं तरी काय?
Air India Flight Viral News : एअर इंडियाची फ्लाईट AI 2336 मध्ये एका प्रवाशाच्या संतापजनक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली. एका प्रवाशाने बिजनेस क्लासमध्ये बसलेल्या अन्य एका प्रवाशावर लघवी केली. ही धक्कादायक घटना दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये घडली. ज्या व्यक्तीवर लघवी केली, ते एका मोठ्या कंपनीचे अधिकारी आहेत, असं माहिती आहे. आरोपी प्रवासी बिजनेस क्लासच्या 2D सीटवर बसला होता.
एअर इंडियाकडून माहिती देण्यात आलीय की, क्रू मेंम्बर्सकडून घटनेची माहिती मिळताच सर्व नियमांच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. आरोपी प्रवाशाला सूचना देण्यात आली असून पीडित प्रवाशाला थायलँडमध्ये तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आलाय. परंतु, पीडित व्यक्तीने त्यावेळी तक्रार नोंदवण्यास नकार दिला.
प्रवाशावर कारवाई करण्यासाठी एअरलाईन्सने स्वतंत्र कमिटी बनवली
फ्लाईटने बँकॉकला लँड केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला. त्यांनंतर आरोपी प्रवाशाने चूक कबूल करत माफी मागितली. एअर इंडियाने या घटनेचा तपास करण्यासाठी स्वतंत्र कमिटी बनवली आहे. आरोपीवर पुढे काय कारवाई केली जाईल, याचा निर्णय कमिटी घेणार आहे.
हे ही वाचा >> राहुल गांधींनी महाराष्ट्राचा 'तो' मुद्दा का धरलाय लावून? क्रोनोलॉजी समजून घ्या!
एअरलाईनने म्हटलं की, अशा प्रकारच्या घटनांवर कारवाई करण्यासाठी DGCA कडून निश्चित केलेल्या नियमांचं पालन केलं जात आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडली नाहीय. पण बिझनेस क्लासमध्ये ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याआधी नोव्हेंबर 2022 मध्येही एका प्रवाशाने फ्लाईटमध्ये लघवी केल्याचं प्रकरण समोर आलं होतं.
एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाईटमध्ये शंकर मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने महिला प्रवाशावर लघवी केली होती. या घटनेनंतर 6 जानेवारी 2023 ला आरोपी शंकर मिश्राला बंगळुरुहून अटक केली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर 31 जानेवारी 2023 ला त्याला जामीन देण्यात आला.