Maharashtra Weather : मराठवाडा आणि विदर्भात वादळ घोंगावणार! 'या' भागात होणार पावसाचं जोरदार आगमन

मुंबई तक

 Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची नोंद करण्यात आलीय. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Today (फोटो सौजन्य - AI)
Maharashtra Weather Today (फोटो सौजन्य - AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात उसळणार उष्णतेची लाट?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

जाणून घ्या राज्यातील आजच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची नोंद करण्यात आलीय. काल बुधवारी कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान नोंदवण्यात आलं. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील  जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला  होता.

अशातच आज राज्यात कशाप्रकारचं हवामान असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> राहुल गांधींनी महाराष्ट्राचा 'तो' मुद्दा का धरलाय लावून? क्रोनोलॉजी समजून घ्या!

उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील  जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २५°C च्या आसपास असेल.

हे ही वाचा >> 'या' तारखेपासून मुंबईचा Elphinstone Bridge दोन वर्षांसाठी राहणार बंद! वाहतुकीचे पर्यायी मार्ग कोणते?

मुंबईत काल बुधवारी उष्णतेच्या लाटा पसरल्याचं चित्र होतं. मुंबई शहर आणि उपनगरात जवळपास 34 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला. आजही मुंबईत  ३५°C आणि २५°C च्या आसपास तापमानाची नोंद असणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp