Santosh Deshmukh Case : "रात्री कुणी झोपत नाही, जेवण वेळेवर नाही, सावरणं खूप अवघड आहे ताई..."

मुंबई तक

दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरी, कृष्णा आंधळे हा आरोपी सापडत नाही, यावरुन माणूस सापडूच शकत नाही यावर आपला विश्वास बसत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रिया सुळे देशमुख कुटुंबाच्या भेटीला मस्साजोगमध्ये

point

संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटले

point

कुटुंबाने, गावकऱ्यांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप

"वेड लागल्यासारखं झालंय आईला, त्या दिशेला इथून पुढं कसं कुणाला पाठवणार? आम्ही खूप आनंदी होतो, पण आता कठीण झालंय, कुणी वेळेवर जेवत नाही, झोप लागत नाही, या दु:खातून सावरणं कठीण आहे ताई..." अशा भावना संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडल्या. सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली.यावेळी जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, मेहबूब शेख, सक्षना सलगर हे सुद्धा तिथे उपस्थित होते.

हे ही वाचा >>Akola : वाद, मारहाण, दगडफेक ते जाळपोळ... अकोल्यातील हातरूण गावात नेमकं काय घडलं होतं?

सरपंच असल्यानं आवादा कंपनीच्या वादात वडिलांना बोलावलं. तेव्हा वडील गेले तर त्यांनाही मारलं. म्हणून गावातले लोक तिथे गेले आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी 9 तारखेला ही घटना केली. 6 तारखेपासून ते वडिलांवर पाळत ठेवून होते असं संतोष देशमुख यांच्या मुलीने सांगितलं. पोलिसांनी लवकर तक्रार घेतली नाही, आम्हाला चुकीच्या दिशेला पाठवलं, पटकन जामीन होईल अशी कलमं पोलिसांनी दाखल केलीत असं गावकऱ्यांनी सांगितलं.

हे ही वाचा >>Sanjay Raut : 'वाल्किम कराडचा बॉस धनंजय मुंडे...', धस-मुंडे भेटीनंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

यावेळी संदीप क्षीरसागर असंही म्हणाले, पोलिसांचे सीडीआर तपासले तरी बऱ्याच गोष्टी समोर येतील. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरी, कृष्णा आंधळे हा आरोपी सापडत नाही, यावरुन माणूस सापडूच शकत नाही यावर आपला विश्वास बसत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मस्साजोगच्या गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे, आरोपी सुटले तर लोक कामासाठी घराबाहेर निघू शकणार नाही. एवढ्या लहानश्या कारणावरुन जर सरपंचाला अशा पद्धतीनं मारणार असतील तर गावातल्या इतर लोकांचं काय अशी भावना संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp