Waghdoh Tiger: ताडोबातल्या सर्वात वयोवृद्ध वाघडोह या वाघाचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चंद्रपुरातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या १७ वर्षीय वाघडोह या वाघाचा सोमवारी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी वाघडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाला या ठिकाणी गुराख्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून वाघडोह ताडोबाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष होतं. या वाघाची प्रकृती बरी नव्हती. तो १७ वर्षांचा असल्याने म्हातारा झाला आहे. आज सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

दोन दिवसांपूर्वी या वाघाचे काही फोटोही व्हायरल झाले होते. हा वाघ वयस्कर झाला होता त्यामुळे त्याला शिकार करणंही अवघड झालं होतं. हा वाघ वाघडोह या भागात दीर्घकाळ राहिल्याने त्याला वाघडोह हे नाव दिलं गेलं होतं. आज सकाळी या १७ वर्षांच्या वाघाचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

एक काळ असा होता की वाघडोह या वाघाचा ताडोबा जंगलात दरारा होता. मात्र कालांतराने त्याचं वर्चस्व होतं मात्र हळूहळू इतर वाघांनी त्याला हुसकावून लावलं होतं असंही काही वन्यप्रेमींचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता. वयस्कर असल्याने त्याला शिकार करणं अशक्य होतं. तसंच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडलं होतं. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह वाघाचा वावर होता. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग वाघावर नजर ठेवून होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT