‘चिंधी’ची सिंधुताई झाली अन् हजारो अनाथांना माय मिळाली; असा होता माईंचा संघर्ष
अनाथांना मायेची उब देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सिंधुताई सपकाळ उपाख्य माई यांची प्राणज्योत मंगळवारी (4 जानेवारी) मालवली. त्यांच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं महाराष्ट्रभर पसरलं. सिंधुताईं सपकाळाच्या जाण्याने त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना लोकांकडून उजाळा दिला जात आहे. असा होता माईंचा संघर्ष जन्म वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावचा. जन्मतारीख १४ नोव्हेंबर १९४८. वडील अभिमानजी […]
ADVERTISEMENT

अनाथांना मायेची उब देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सिंधुताई सपकाळ उपाख्य माई यांची प्राणज्योत मंगळवारी (4 जानेवारी) मालवली. त्यांच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं महाराष्ट्रभर पसरलं. सिंधुताईं सपकाळाच्या जाण्याने त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना लोकांकडून उजाळा दिला जात आहे.
असा होता माईंचा संघर्ष
जन्म वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावचा. जन्मतारीख १४ नोव्हेंबर १९४८. वडील अभिमानजी साठे यांचा गुरे राखण्याचा व्यवसाय. घरी मुलगी जन्माला आली म्हणून तिचे नाव ‘चिंधी’ ठेवलं, पण हीच ‘चिंधी’ पुढे शेकडो अनाथ बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि स्वतंत्र ओळख मिळवून देणारी त्यांची ‘माई’ आणि समाजात ‘सिंधूताई’ म्हणून ख्यातनाम झाली.